🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी बाबरी मस्जिद माझ्या शिवसैनिकांनी पाडली, एवढे समर्थन केले होते. मात्र, आज त्यांच्याच शिवसेनेने सर्वच भूमिकांमध्ये बदल केला आहे. सध्या शिवसेनेने हिंदुत्व सोडले असून सत्ता टिकवण्यासाठी आपली सर्व तत्वे गुंडाळली आहेत, असा घणाघात माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
नगरचे नूतन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांची भेट घेण्यासाठी आ.विखे पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधून मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर तोफ डागली.
आ.विखे पुढे म्हणाले की, बाबरी मशीद पडली तेव्हा महाराष्ट्रात आगडोंब उसळल्यावर फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पुढे आली. त्यामुळे हा महाराष्ट्र वाचला. परंतु आजच्या शिवसेनेचा विचार केला तर त्यांनी सत्ता टिकवण्यासाठी सर्व मुद्दे सोडून दिले आहेत, हिंदुत्व सोडले आहे. आज शिवसेनेने सर्वच भूमिकांमध्ये बदल केला आहे, अशी टीका विखे पाटलांनी केली.
विधानसभेवर स्वबळावर भगवा फडकविण्याचे वक्तव्य मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. यावर बोलताना माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, शिवसेनेचा स्वबळाचा नारा ही वादळापूर्वीची शांतता दिसतेय.
महाविकास आघाडीत का बेबनाव झाला? तो का वाढत आहे? शिवसेना स्वबळावर लढण्याचा नारा का देत आहेत? राज्यातील जनतेसाठी नव्हे तर मूठभर लोकांना सत्ता टिकवण्यासाठी महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत, असे आ.विखे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- सिंघम गर्ल अडकणार लवकरच लग्न बंधनात, पहा फटोज
- #पुलवामा हल्ल्याची दिली कबूली,पाकड्यांचा दहशतवादी चेहरा उघड
- १ नोव्हेंबरपर्यंत मंदिरे उघडा अन्यथा टाळे तोडू; भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचा इशारा
- मुंबई : ९०० कोटींचा जमीन घोटाळा झाल्याचा सोमय्या यांचा आरोप;चौकशी करण्याची मागणी
- निष्टावंतांना डावलून कॉंग्रेसकडून ‘हे’ नाव निश्चित ; वाचा काय आहे प्रकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

