Share

…त्यांचे पक्षप्रवेश रात्रीच्या अंधारात न होता दिवसाढवळ्या होतील

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली असून एकनाथ खडसे अधिकृतरित्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आहे. येत्या शुक्रवारी म्हणजेच २३ ऑक्टोबरला एकनाथ खडसे दुपारी २ वाजता प्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

गेले अनेक महिने नाराज असलेले खडसे भाजपला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चा केल्या जात होत्या मात्र त्यांनी अशा अनेक मुहूर्तांना हुलकावणी दिली होती. मात्र, अखेर आज भाजपची ४० वर्षांची असलेली साथ सोडून त्यांनी पक्षाकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.

दरम्यान, जंत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये सूचक वक्तव्य केलं आहे. ‘अनेकांना आता विश्वास बसू लागला आहे की भाजप राज्याचा, देशाचा विकास करू शकत नाही. अनेक माजी-आजी आमदार, नेते आमच्या संपर्कात आहेत. ते राष्ट्रवादी पार्टीमध्ये येण्यास इच्छुक आहेत. योग्य वेळी नावे जाहीर केली जातील. त्यांचे पक्षप्रवेश रात्रीच्या अंधारात न होता दिवसाढवळ्या होतील.’ असा टोला त्यांनी भाजपसह देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.

फक्त देवेंद्र फडणवीसांमुळे राजीनामा दिला – खडसे

‘पक्षाने मला अनेक मोठी पदं दिली. मात्र आता मला कोणत्याही पदाची अपेक्षा नव्हती पण माझ्याशी छळ केला गेला. मी सहन केले, भ्रष्टाचाराचा आरोप केला गेला, विधानमंडळातील रेकॉर्ड काढावं, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यापैकी एकाही पक्षाने माझ्या चौकशीची मागणी केली नव्हती, तसं झाल्यास मी राजकारण सोडेन, तरीही माझा राजीनामा घेतला. आजही भाजपवर रोष नाही, फक्त देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या वागणुकीमुळे हा निर्णय’ घेतल्याचा गौप्यस्फोट करत त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!