Share

‘देवेंद्र फडणवीस यांचे राजकारण इतकं खुनशी असेल याची यापूर्वी कधी कल्पना केली नव्हती’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली असून एकनाथ खडसे अधिकृतरित्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आहे. येत्या शुक्रवारी म्हणजेच २३ ऑक्टोबरला एकनाथ खडसे दुपारी २ वाजता प्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

गेले अनेक महिने नाराज असलेले खडसे भाजपला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चा केल्या जात होत्या मात्र त्यांनी अशा अनेक मुहूर्तांना हुलकावणी दिली होती. मात्र, अखेर आज भाजपची ४० वर्षांची असलेली साथ सोडून त्यांनी पक्षाकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.

एकनाथ खडसे यांच्या याच पक्षप्रवेशावर राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. ‘देवेंद्र फडणवीस यांचे राजकारण इतकं खुनशी असेल याची यापूर्वी कधी कल्पना केली नव्हती. आज एकनाथजी खडसे साहेबांनी अंतःकरण पुर्वक जे मुद्दे पत्रकार परिषदेत मांडले ते ऐकुन धक्का बसला. चार दशकं ज्यांनी पक्ष वाढवला त्या नेत्यांना असा त्रास? केंद्राने गंभीर दखल घ्यावी’. अस मिटकरी म्हणाले आहेत.

दरम्यान, बहुजन समाजाचा मुख्यमंत्री असला पाहिजे, या माझ्या वक्तव्यानंतर जे घडलं ते महाराष्ट्राला माहिती आहे. एसीबी चौकशी, भूखंड प्रकरण, दमानिया यांनी विनयभंगाचा खोटा खटलाही दाखल केला, पोलिसांच्या नकारानंतरही देवेंद्रजींनी सांगितल्याने खटला नोंदवला असा धक्कादायक आरोप एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!