🕒 1 min read
वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीतील त्यांचे प्रतिस्पर्धी आणि डेमोक्रॅट पक्षाचे बाइडन हे इतिहासातील आतापर्यंतचे सर्वात वाईट उमेदवार असल्याचं म्हटलं आहे. ‘अशा उमेदवाराविरूद्ध लढणे हा एक प्रकारे दबाव असून जर माझा पराभव झाला तर कदाचित मला देशही सोडावा लागेल.’ असं वक्तव्य ट्रम्प यांनी केलं आहे.
डेमोक्रेटचे उमेदवार जो बायडेन अमेरिकेला कम्युनिस्ट देश बनवतील. देशात अपराधांमध्ये सहभागी असलेल्या लोकांची संख्या वाढेल, असा आरोप ट्रम्प यांनी केला. दरम्यान, अमेरिकेतील माध्यमं जनताविरोधी आहेत, असं देखील ट्रम्प म्हणाले आहेत.
https://twitter.com/JoeBiden/status/1317554725596942336?s=20
दरम्यान, अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाकडून विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तर जो बायडेन डेमोक्रॅटिक पक्षाकडून निवडणूक रिंगणात असून सध्या तेथील प्रचार अखेरच्या टप्प्यात आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही उमेदवारांकडून परस्परांवर जोरदार आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदासाठी येत्या तीन नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
- ‘आइटम’ हा सर्रास वापरला जाणारा शब्द आहे,यामध्ये अपमानजनक काय आहे?
- सहकाऱ्याच्या अस्थी विसर्जनावेळी जयंत पाटील झाले भावूक;अश्रू झाले अनावर…
- गाफील राहू नका, अतिवृष्टीचा धोका अद्याप टळलेला नाही : उद्धव ठाकरे
- ‘अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या परिस्थितीचे गांभीर्य शासनाच्या लक्षात आले आहे’
- घरातील अन्नधान्य भिजलंय खायचं काय ? शेतकरी महिलेचा संभाजीराजेंना सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
