Share

गाफील राहू नका, अतिवृष्टीचा धोका अद्याप टळलेला नाही : उद्धव ठाकरे

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर : सद्या शेतकऱ्यांवर चहूबाजुंनी संकटे ओढवली आहेत. कोरोनामुळे आर्थिक चक्र बिघडले आहे, बोगस बियाणं, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, कीड, खतांचा तुटवडा अशा असंख्य अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याला नुकत्याच झालेल्या विक्रमी अतिवृष्टीमुळे हाती आलेलं सोन्यासारखं पिक देखील गमवावं लागलं आहे.

तर, विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोलापुरच्या अक्कलकोट तालुक्यातील काही नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या या दौऱ्यानंतर पत्रकार परिषद घेऊन पुढील कार्यवाहीची माहिती दिली आहे.

यावेळी त्यांनी, ‘धोका अद्याप टळलेला नाही, सर्वांनी काळजी घेणं आवश्यक असून आता जरी पावसाने  काहीशी उघडीप दिली असली तरी येत्या काही दिवसांसाठी हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे कोणीही गाफील, गलथान राहू नका. मला कोणतीही जीवितहानी नको आहे असं सांगतानाच संकटाचा काळ संपेपर्यंत घाई करता येणार नसल्याचं सांगून पंचनामे झालेत, पूर्ण आढावा तातडीने घेऊन, प्रत्यक्ष मदत दिली जाईल असं स्पष्ट केलं. तर, तूर्तास जे बांधव माता मृत्यूमुखी पडले आहेत  त्यांच्या कुटुंबाला दिलासा देण्यास सुरुवात केली. कोणी काळजी करण्याचं कारण नाही, घाबरण्याचं कारण नाही असं आवाहन करून त्यांनी हतबल शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

नुकसानग्रस्तांना धनादेशाचं वाटप !

उद्धव ठाकरेंनी सांगवी, अक्कलकोट येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटपही केले. 11 नुकसानग्रस्तांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोलापुरात धनादेश देण्यात आले. यावेळी एका वृद्ध शेतकऱ्याने गेल्या ७० वर्षात पाऊस झाला नाही एवढा पाऊस त्या २ दिवसात झाला, सगळं वाहून गेलं, खायला-रहायला देखील काही उरलं नाही अशी हृदयद्रावक व्यथा मुख्यमंत्र्यांकडे मांडली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!