Share

‘आइटम’ हा सर्रास वापरला जाणारा शब्द आहे,यामध्ये अपमानजनक काय आहे?

Published On: 

🕒 1 min read

भोपाळ : मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे रविवारी डबरा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश राजे यांच्या प्रचार सभेत सहभागी झाले. यावेळी मतदारांना संबोधित करताना कमलनाथ यांनी भाजपा उमेदवार इमरती देवी यांच्यावर निशाणा साधला. तुम्ही तर त्यांना माझ्यापेक्षा जास्त ओळखता. तुम्ही मला आधीच सावध करायला पाहिजे होते की, त्या काय आयटम आहेत, असे कमलनाथ यांनी इमरती देवी यांचे नाव न घेता टीका केली.

मध्य प्रदेशात सध्या पोटनिवडणुकीचे वारे वाहते आहे.राजकीय नेतेमंडळीकडून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. राजकीय प्रचार शिगेला पोहचला आहे पण यातच मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि डबरा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार इमरती देवी यांच्यावर टीका करताना माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते कमलनाथ यांची जीभ घसरली.

इमरती देवी यांच्यावर टीका करताना कमलनाथ यांनी त्यांचे नाव न घेता त्यांना चक्क आयटम असे संबोधले. दरम्यान, यासंबंधीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.तसेच, कमलनाथ यांनी मतदारांचे कौतुक केले. यावेळी नेते विकले जाऊ शकतात, पण मतदार नाही. त्यामुळे तुम्ही ३ तारखेला सुरेश राजे यांना बहुमताने विजयी करा अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

दरम्यान, आता या प्रकरणामुळे कमलनाथ यांच्यावर चौफेर टीका होऊ लागताच आता त्यांनी सारवासारव केली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या यादीवर आइटम नंबर 1 , आइटम नंबर 2 असे उल्लेख असतात. त्यामुळे मी आइटम हा शब्द वाईट हेतूने किंवा अपमान करण्याच्या हेतूने वापरला नव्हता. या शब्दात काहीही वावगे नाही. सभेतील भाषणावेळी मला आमदार इमरती देवी यांचे नाव आठवत नव्हते. त्यामुळे मी त्यांचा उल्लेख ‘येथील जो आइटम आहे’, असा केल्याचे स्पष्टीकरण कमलनाथ यांनी दिले.

आइटम हा सर्रास वापरला जाणारा आणि संसदीय शब्द आहे. विधानसभेतही तो वापरला जातो. यामध्ये अपमानजनक काय आहे? भाजपकडे सध्या बोलण्यासारखे काहीही नाही. त्यामुळे जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी ते कोणताही मुद्दा धरून बसतात, अशी टीकाही कमलनाथ यांनी केली.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!