🕒 1 min read
मुंबई : टेलेव्हिजन क्षेत्रात खळबळ माजवणाऱ्या टीआरपी घोटाळ्याचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर आता जाहिरातदार देखील त्यासंदर्भात मोठा निर्णय घेत आहेत. या वृत्तवाहिन्यांना जाहिराती न देण्याचा निर्णय बजाज ऑटोने घेतल्यानंतर आता पाठोपाठ बिस्किटांचे उत्पादन करणाऱ्या पार्ले कंपनीनेही आपल्या जाहिराती काही वृत्तवाहिन्यांवर न दाखवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. टीआरपी घोटाळा पोलिसांनी उघड केल्यानंतर यावर आम्ही लक्ष ठेवून असल्याचे प्रमुख जाहिरातदार आणि मीडिया एजन्सीने म्हटले आहे.
आम्ही द्वेष पसरवणाऱ्या वृत्तवाहिन्यांना जाहिराती न देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कंपनीचे वरिष्ठ अधिकारी कृष्णराव बुद्ध यांनी दिली. याबाबत ते म्हणाले की, अशी शक्यता आम्ही पडताळत आहोत, ज्यात इतर जाहिरातदार एकत्र येतील आणि वृत्तवाहिन्यांवर जाहिराती देण्याच्या आपल्या खर्चाला आळा घालतील, जेणेकरुन वृत्तवाहिन्यांना स्पष्ट संकेत जाईल की, आपल्या मजकुरात बदल करणे त्यांना गरजेचे आहे. आम्हाला आक्रमकता आणि द्वेष वाढवण्यास प्रोत्साहन देणाऱ्या वाहिन्यांवर खर्च करायचा नाही, कारण ते आमचे ग्राहक नाहीत.
Parle Products has decided not to advertise on news channels that broadcast toxic aggressive content.
These channels are not the kinds that the company wants to put money into as it does not favour its target consumer.
It's time more companies join the lead of Bajaj and Parle. pic.twitter.com/LNXr9ytmBF
— Indian Civil Liberties Union (@ICLU_Ind) October 11, 2020
दरम्यान, पार्लेच्या आधी उद्योजक आणि बजाज ऑटोचं व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी तीन वृत्तवाहिन्यांना ब्लॅकलिस्ट केल्याचं सांगितलं होतं. राजीव बजाज म्हणाले होते की,”एक मजबूत ब्रॅण्ड असा पाया असतो ज्यावर तुम्ही एक मजबूत व्यवसाय उभा करता. अखेर एका व्यवसायाचा उद्देशही सामाजात काही योगदान देण्याचा असतो. आमचा ब्रॅण्ड कधीही अशा कोणाशीच जोडलेला नाही जे समाजात द्वेष पसरवण्याचा स्रोत असल्याचं आम्हाला वाटतं.”
महत्वाच्या बातम्या-
- मुंबई बत्ती गुल झाल्याने सर्वसामन्यांचे हाल; मुख्यमंत्र्यांनी दिले तातडीने चौकशीचे आदेश
- प्रत्येकाला लस मिळण्यासाठी कोरोनावरील एकाहून अधिक लशींचा वापर सरकार करणार
- “मेट्रो कार शेड कांजूरला नेण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा फसवी”
- ‘त्या’ जमिनीसाठी सरकारला 2000 कोटी डिपॉझिट करावे लागतील : सोमय्या
- भजन सम्राट अनुप जलोटा आणि जसलीन यांच्या लग्नावर मोठा गौप्य स्फोट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
