🕒 1 min read
मुंबई-कांजूर येथील कारशेडसाठी मेट्रोला राज्य सरकारकडून मोफत जमीन दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. तसेच आरेतील कारशेडसाठी आतापर्यंत खर्च झालेला पैसा फुकट जाऊ देणार नाही. आरेत मेट्रोच्या कारशेडसाठी उभारण्यात आलेली इमारत अन्य कामांसाठी वापरली जाईल. तसेच या भागात उभारण्यात आलेले बोगदे आणि ट्रॅक मेट्रोच्या उर्वरित मार्गाशी जोडले जातील, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मुंबईतल्या मेट्रो 3 ची कारशेड कांजूरमार्ग इथं हलवण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर कांदिवली पूर्वचे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी घणाघाती टीका केली आहे.“मेट्रो कार शेड कांजूरला नेण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा फसवी आहे. कारण ही जमीन कोर्टकज्ज्यात अडकलेली आहे. मुंबईत कारशेडसाठी फक्त आरेची जमीन उपयुक्त असल्याचा तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल असताना ही उठाठेव कशाला?” असा सवाल त्यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील जनतेशी खोटं बोलून जनतेची दिशाभूल करत आहेत” असा आरोप भातखळकर यांनी केला. मेट्रो कारशेडच्या कामाला मागच्या नऊ महिन्यापासून स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे जनतेचं दिवसाला पाच कोटी रुपयांचं नुकसान होत आहे असं ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
- Bihar Election 2020: “मोदी हैं तो मुमकीन हैं, नितीश हैं तो संभव हैं”
- प्रत्येकाला लस मिळण्यासाठी कोरोनावरील एकाहून अधिक लशींचा वापर सरकार करणार
- ‘तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावेत यासाठी शासनासह वैयक्तिक स्तरावर प्रयत्नशील’
- ‘सोशल मिडियावर एखाद्याला शिवीगाळ करणं… ट्रोल करणं… खाजगी आयुष्यात डोकावणं चुकीचं’
- Bihar Election 2020 : भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत मोदी-फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
