मुंबई : रियालिटी शो ‘बिग बॉस’ मध्ये दारवर्षी एखादी जोडी नेहमी चर्चेत असते, अशीच एक जोडी ‘बिग बॉस’ मध्ये बरीच चर्चेत आली होती, ती म्हणजे जसलीन आणि भजन सम्राट अनुप जलोटा. जसलीन हि अनुप जलोटा यांच्या पेक्षा ३० वर्षांनी लहान आहे. अनुप जलोटा यांची शिष्य देखील आहे. याच कारणामुळे यांची जोडी चर्चेत आली होती.
सध्या जसलीन आणि भजन सम्राट अनुप जलोटा यांचा एक फोटो सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल झाला आहे. यांच्या या फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे या फोटो मध्ये जसलीन ही नवरीच्या रूपात दिसत आहे तर, अनुप जलोटा नवरदेवाच्या रूपात दिसत आहेत. या फोटो वरून सगळयांना असे वाटत आहे कि अनुप जलोटा आणि जसलीनचे लग्न झाले आहे. यावरून सोशल मीडियावर चर्चा चालू आहे आणि शोशल मीडियावरून दोघांनाही शुभेच्छा मिळत आहेत.
या सगळ्यावरती आता अनुप जलोटा यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या लग्नाची बातमी खोटी असल्याची सांगितली आहे. त्यांनी असे सांगितले कि, जसलीन हि खूप मॉर्डन आहे तिची मॉर्डन ड्रेसिंग आमच्या परिवराला चालणार नाही. आम्ही धोती-कुर्ता घालणारी माणस भक्ती भजन गातो. जसलीन हे सगळं कस म्यॅच करू शकेल जरी मी ३० वर्षाचा असतो तरी जसलीन सोबत लग्न केलं नसत.
त्यांच्या या व्हायरल झालेल्या फोटो बद्दल सांगताना म्हणाले कि, आम्ही दोघे फक्त एका सिनेमाचे शूट करत आहोत. वो ‘मेरी स्टुडन्ट’ या सिनेमा मधील हा लुक आहे असे अनुप जलोटा यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या-
- मुंबई बत्ती गुल झाल्याने सर्वसामन्यांचे हाल; मुख्यमंत्र्यांनी दिले तातडीने चौकशीचे आदेश
- प्रत्येकाला लस मिळण्यासाठी कोरोनावरील एकाहून अधिक लशींचा वापर सरकार करणार
- “मेट्रो कार शेड कांजूरला नेण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा फसवी”
- ‘त्या’ जमिनीसाठी सरकारला 2000 कोटी डिपॉझिट करावे लागतील : सोमय्या
- अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम प्रवेशासाठी गुणांची अट शिथिल


