🕒 1 min read
मुंबई-कांजूर येथील कारशेडसाठी मेट्रोला राज्य सरकारकडून मोफत जमीन दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सांगितले. तसेच आरेतील कारशेडसाठी आतापर्यंत खर्च झालेला पैसा फुकट जाऊ देणार नाही. आरेत मेट्रोच्या कारशेडसाठी उभारण्यात आलेली इमारत अन्य कामांसाठी वापरली जाईल. तसेच या भागात उभारण्यात आलेले बोगदे आणि ट्रॅक मेट्रोच्या उर्वरित मार्गाशी जोडले जातील, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
ठाकरे सरकारने घेतलेल्या या निर्णयावर विरोधकांनी कडाडून टीका केली आहे. मेट्रोची आरेतील कारशेड कांजूरमार्गला हलवल्यामुळे या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च तब्बल 5000 कोटी रुपयांनी वाढेल, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. सरकारने कारशेडसाठी निवडलेली कांजूरमार्गची जमीन नेमकी आहे तरी कुठे? मेट्रोची कारशेड दलदलीच्या भागात उभारली जाणार का उच्च न्यायालयात निकाल प्रलंबित असलेल्या जमिनीवर? या जमिनीसाठी सरकारला 2000 कोटी डिपॉझिट करावे लागतील. परंतु, मुख्यमंत्री ही गोष्ट लपवून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.
तर दुसऱ्या बाजूला मुंबईतल्या मेट्रो 3 ची कारशेड कांजूरमार्ग इथं हलवण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर कांदिवली पूर्वचे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी घणाघाती टीका केली आहे.“मेट्रो कार शेड कांजूरला नेण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा फसवी आहे. कारण ही जमीन कोर्टकज्ज्यात अडकलेली आहे. मुंबईत कारशेडसाठी फक्त आरेची जमीन उपयुक्त असल्याचा तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल असताना ही उठाठेव कशाला?” असा सवाल त्यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील जनतेशी खोटं बोलून जनतेची दिशाभूल करत आहेत” असा आरोप भातखळकर यांनी केला. मेट्रो कारशेडच्या कामाला मागच्या नऊ महिन्यापासून स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे जनतेचं दिवसाला पाच कोटी रुपयांचं नुकसान होत आहे असं ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
- Bihar Election 2020: “मोदी हैं तो मुमकीन हैं, नितीश हैं तो संभव हैं”
- प्रत्येकाला लस मिळण्यासाठी कोरोनावरील एकाहून अधिक लशींचा वापर सरकार करणार
- “मेट्रो कार शेड कांजूरला नेण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा फसवी”
- ‘सोशल मिडियावर एखाद्याला शिवीगाळ करणं… ट्रोल करणं… खाजगी आयुष्यात डोकावणं चुकीचं’
- Bihar Election 2020 : भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत मोदी-फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
