नवी दिल्ली- भारतात लोकसंख्येचे प्रमाण अधिक असल्यानं सर्वांच्या सोयीसाठी कोरोनावरील एकाहून अधिक लशींचा वापर करण्याबाबत केंद्र सरकार विचार करत असल्याचं आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी काल सांगितलं. एकच लस उत्पादक कंपनी सर्व देशाला लस पुरवू शकणार नाही, त्यामुळे प्रत्येकाला लस मिळण्यासाठी विविध कंपन्यांबरोबर करार करण्याचा पर्याय विचारात असल्याचं ते म्हणाले. ‘रविवार संवाद’ या कार्यक्रमात त्यांनी काल पत्रकारांशी संवाद साधला. आकाशवाणीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
दरम्यान, भारताने काल आणखी एक मैलाचा टप्पा गाठला. देशात कोविडमधून बरे झालेल्यांची एकूण संख्या 60 लाखांहून अधिक (60,77,976 ) झाली आहे. दररोज मोठ्या संख्येने कोविड रुग्ण बरे होत असून उच्च संख्येने रुग्ण बरे होण्याचा कल कायम आहे. देशात गेल्या 24 तासात 89, 154 रुग्ण बरे झाले आहेत.
देशभरात वैद्यकीय पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांद्वारे केंद्राच्या प्रमाणित उपचार प्रोटोकॉलची अंमलबजावणी आणि डॉक्टर, निमवैद्यकीय आणि आघाडीवर काम करणाऱ्यांची समर्पित वृत्ती तसेच वचनबद्धता यामुळे दैनंदिन मृत्यूच्या संख्येत सातत्याने घसरण झाली असून बरे होणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ दिसून आली आहे.
गेले सलग आठ दिवस नवीन मृत्यूची नोंद 1000 पेक्षा कमी नोंदली गेली आहे. देशात गेल्या 24 तासात 918 मृत्यूंची नोंद झाली.देशातली सक्रिय रुग्णांची संख्या 8,67,496 आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येतली घट कायम असून गेल्या तीन दिवसात ती 8 लाखांपेक्षा कमी आहे.
महत्वाच्या बातम्या-
- Bihar Election 2020: “मोदी हैं तो मुमकीन हैं, नितीश हैं तो संभव हैं”
- ‘राहुल आणि प्रियंका गांधी यांना शेळ्यामेंढ्यामधला फरक सुद्धा कळणार नाही’
- ‘तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावेत यासाठी शासनासह वैयक्तिक स्तरावर प्रयत्नशील’
- ‘सोशल मिडियावर एखाद्याला शिवीगाळ करणं… ट्रोल करणं… खाजगी आयुष्यात डोकावणं चुकीचं’
- Bihar Election 2020 : भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत मोदी-फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

