🕒 1 min read
मुंबई : नुकतच हाथरस प्रकरणानंतर पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी याना ग्रेटर नोएडाजवळ पोलिसांनी रोखले. त्यानंतर हाथरसला पायीच जाण्याचा निर्णय राहुल गांधी यांनी घेतला. मात्र यमुना एक्स्प्रेस वेवर त्यांना प्रशासनाने पुन्हा रोखण्याचा प्रयत्न केला. या वेळी राहुल गांधी आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली होती. यातच राहुल गांधी यांचा तोल जाऊन ते पडले.
या प्रकरणावर केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधींची खिल्ली उडवली आहे.“गर्दीत जाण्याची सवय नसल्या कारणाने गर्दीत कसं चालावं हे त्यांना कळलं नाही. यामुळे राहुल गांधी पडले.” असा टोला दानवे यांनी लगावला आहे.
दरम्यान, रावसाहेब दानवे यांच्या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘रावसाहेब दानवे किती रस्त्यावर असतात हे आम्हा सर्वांना माहिती आहे. मुळात ते लाटेवर निवडून आले आहेत. परिणामी त्यांच्याविषयी फार बोलण्याची गरज नाही. याउलट राहुल गांधी हे गरीब माणसांमध्ये मिसळतात,’ असं थोरात म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
- दिग्विजय सिंह यांची कन्या शूटर श्रेयसी सिंहचा भाजपमध्ये प्रवेश
- शिवसेना बिहारमध्ये ५० जागा लढवणार? संजय राऊत म्हणतात…
- कॉंग्रेसच्या ‘या’ दिग्गज नेत्याच्या १४ मालमत्तांवर सीबीआयची छापेमारी
- #व्यक्तिविशेष – रिषभ पंत : भारतीय क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये शतक झळकवणारा पहिला यष्टीरक्षक फलंदाज…
- प्रियंका गांधींसोबत गैरवर्तन करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, चित्रा वाघ यांची योगींकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
