Share

#व्यक्तिविशेष – रिषभ पंत : भारतीय क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये शतक झळकवणारा पहिला यष्टीरक्षक फलंदाज…

Published On: 

दिग्विजय दीक्षित, पुणे : मालिकेतील ५ पैकी केवळ १ सामना जिंकलेला आणि ३ सामने गमावलेला अशा परिस्थितीतील २०१८ सालचा इंग्लंड दौऱ्यावर गेलेला त्यावेळचा भारतीय संघ. पाचव्या सामन्यात सुद्धा भारतीय खेळाडूंनी त्यांना साजेशी अशी कामगिरी केलेली नव्हती.

पाचव्या सामन्यात इंग्लंडने जेव्हा ४३८ धावांवर त्यांचा डाव घोषित केला तेव्हासुद्धा त्यांच्याकडे ४६३ धावांची भरभक्कम आघाडी होती. भारताची दुसऱ्या डावातील फलंदाजी सुरू झाली ती एकामागून एक धक्के खातंच. शिखर धवन, विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा हे तिघेही अत्यंत स्वस्तात बाद झाले, त्यानंतर आलेल्या रहाणेने राहुलच्या मदतीने थोडा जम बसवायचा प्रयत्न केला. परंतु तो सुद्धा ३७ धावा करुन बाद झाला आणि लगेच हनुमा विहारीही शून्यावर बाद झाला.

यानंतर १२१-५ अशा बिकट अवस्थेत मैदानावर उतारला तो रिषभ पंत हा नवखा फलंदाज की ज्याचे वय त्यावेळी जेमतेम २० वर्षांचे होते. अशा वेळी इंग्लंडच्या उसळणाऱ्या खेळपट्टीवर, चौथ्या डावात त्याच्याकडून फारशी अपेक्षा कोणी केलेली नव्हती कारण संपूर्ण मालिकेतही त्याने खूप जास्त भरीव अशी कामगिरी केलेली नव्हतीच.

परंतु त्या दिवशी या खेळाडूने सर्वांच्या अपेक्षेच्या विरुद्ध जात अत्यंत बहारदार कामगिरी करत राहुलच्या मदतीने इंग्लंडच्या गोलंदाजांना समर्थपणे तोंड देत सहाव्या विकेटसाठी तब्बल दोनशे धावांची भागीदारी रचली. याचबरोबर या दोन्ही खेळाडूंनी इंग्लंच्या भूमीवर आपापली शतकेही पूर्ण केली.
३२५ धावांचा आकडा बोर्डवर असताना आदिल रशीदच्या अत्यंत जबरदस्त फिरकी चेंडूवर राहुल चकला आणि बाद झाला, त्यानंतर लगेच रिषभही बाद झाला. पुढे जाऊन हा सामना आणि मालिका जरी भारताने गमावली असली, तरी त्या दिवशी या जेमतेम २० वर्षाच्या खेळाडूने इंग्लंडच्या भूमीवर शतक झळकवणारा ‘पहिला यष्टीरक्षक’ होण्याचा सन्मान मिळवला.

यानंतर पुढच्याच वर्षी २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियामध्येही शतक झळकावत त्याने ऑस्ट्रेलियामध्येही शतक झळकवणारा ‘पहिला यष्टीरक्षक’ होण्याचा सन्मान मिळवला. याचबरोबर त्याने भारतीय संघात जम बसवला आणि महेंद्रसिंग धोनीचा उत्तराधिकारी म्हणून त्याच्याकडे पाहू जाऊ लागले.

क्रिकेटमधील विविध तज्ज्ञांच्या मते या खेळाडूकडे प्रचंड सामर्थ्य आहे परंतु काहीवेळा तो उतावीळपणे तो काही फटके मारून बाद होण्याचे प्रसंग झालेले आहेत, तरी या खेळाडूने केवळ या गोष्टीवर लक्ष केंद्रित केल्यास तो नक्कीच भारतीय संघात एक उत्तम यष्टीरक्षक आणि फलंदाज म्हणून नावारूपास येऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!