मुंबई : बिहार विधानसभा निवडणूक २०२० च्या तारखांची निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली आहे. एकूण २४३ मतदारसंघन असलेल्या बिहार विधानसभेचा कार्यकाळ येत्या २९ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत आहे.
‘बिहार विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३० ते ५० जागा लढण्याबाबतचा आमचा विचार आहे. दोन दिवसात त्यावर अंतिम निर्णय होईल, असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले. माजी पोलीस अधिकारी गुप्तेश्वर पांडे यांच्याविरोधात शिवसेना उमेदवार देणार का? या प्रश्नावर त्यांनी दोन दिवस थांबा. सर्व चित्रं स्पष्ट होईल,’ असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.
काही दिवसांपूर्वी बिहारमधील शिवसेना नेत्यांनी मुंबईमध्ये संजय राऊत यांची भेट घेतली होती. यावेळी शिवसेना बिहारचे प्रमुख हौसलेंद्र शर्मा हे देखील उपस्थित होते. बिहार निवडणुकांमध्ये ५० जागा पक्षाने लढवाव्या अशी मागणी कार्यकर्त्यांची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तर,योग्य वेळी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच निर्णय घेतील असे संजय राऊत यांनी सांगितले होते.
आता आज सामनातून गुप्तेश्वर पांडे आणि कंगना रानौतवर निशाणा साधल्यानंतर बिहार निवडणुकांमध्ये शिवसेनेचा काय अजेंडा असेल हे पाहणं महत्वाचं आहे. दरम्यान, शिवसेनेने मोठ्या प्रमाणात जागा लढवल्यास भाजपला मात्र त्यामुळे मोठं नुकसान होऊ शकत. हिंदू मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा तिसऱ्या पक्षाला होण्याची स्थिती नाकारता येणार नाही.
दुसरीकडे, राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये सामील असलेल्या काँग्रेस आणि शिवसेनेने वेगवेगळ्या निवडणूक लढवल्यास काँग्रेसला देखील नुकसान होऊ शकते आणि महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून दोन मित्र पक्ष निवडणुकीत आमने-सामने येण्याची ही पहिलीच वेळ ठरेल.
महत्वाच्या बातम्या :-
- दिग्विजय सिंह यांची कन्या शूटर श्रेयसी सिंहचा भाजपमध्ये प्रवेश
- गुप्तेश्वरांना महाराष्ट्रद्वेषाचा गुप्तरोग झाला होता, पण…शंभर दिवस खाजवूनही शेवटी हाती काय लागले?
- कॉंग्रेसच्या ‘या’ दिग्गज नेत्याच्या १४ मालमत्तांवर सीबीआयची छापेमारी
- #व्यक्तिविशेष – रिषभ पंत : भारतीय क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये शतक झळकवणारा पहिला यष्टीरक्षक फलंदाज…
- प्रियंका गांधींसोबत गैरवर्तन करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, चित्रा वाघ यांची योगींकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

