🕒 1 min read
मुंबई – लैंगिक शोषण आणि गैरवर्तन केल्याप्रकरणी दिग्दर्शक अनुराग कश्यपची काल आठ तास चौकशी करण्यात आली आहे. अभिनेत्री पायल घोष हिने काही दिवसांपूर्वी अनुरागवर लैंगिक गैरवर्तन केल्याचे आरोप केले होते.या चौकशीत वर्सोवा पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवून घेतला आहे.
पायलच्या तक्रारीवरून १ ऑक्टोबरला पोलिसांनी अनुराग कश्यपला चौकशीसाठी बोलवले होते.अनुराग कश्यपने त्याच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप त्याने फेटाळले आहेत. अनुरागच्या वकिलांनी याबाबत पत्रकारांशी बोलतांना सांगितले की,’संपूर्ण ऑगस्ट 2013 मध्ये त्यांच्या एका सिनेमाच्या शूटिंगसाठी कश्यप श्रीलंकेत होते आणि त्यासंदर्भातील दस्ताऐवजांचा पुरावा त्यांनी दिला आहे.
कश्यप यांनी आरोप करण्यात आलेली अशी काही घटना घडलीच नसल्याचे सांगितले आहे आणि त्यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. ‘चौकशीत अनुरागने पायल घोषचे सर्व आरोप खोटे असल्याचं म्हटलंय. सोबतच अनुरागची वकील प्रियंका खिमानी यांनी याबाबत स्टेटमेंट जारी केलं आहे.
Mr.Kashyap has lied bfr police in his statement..my Lawyer,is moving an application 2conduct Narco Analysis,Lie Detector &Polygraph Test of Mr.kashyap 2find out d truth Today application wl be filed to d police station,4 d interest of Justice @narendramodi @AmitShah #BetiBachao
— Paayel Ghosh ????️ (@iampayalghosh) October 2, 2020
यावर प्रतिक्रिया देत पायल म्हणाली की, अनुराग खोटं बोलत आहे.पायलने ट्विट करत लिहिले की, ‘मिस्टर अनुराग कश्यपने पोलिसांना दिलेली माहिती खोटी आहे. सत्य समोर आणण्यासाठी माझे वकील अनुराग कश्यपची नार्को एनालिसिस, लाय डिटेक्टर आणि पॉलिग्राफ टेस्ट करण्याचा अर्ज देतील. न्याय मिळवण्यासाठी आज पोलीस स्टेशनमध्ये हा अर्ज दिला जाईल’. पायलने तिच्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनाही टॅग केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुण्यात युवा सेना नेत्याची तीक्ष्ण हत्यारांनी वार करून हत्या
- मित्रा डोनाल्ड,लवकर बरा हो….’; मोदींनी दिल्या ट्रम्प यांना शुभेच्छा
- दरेकरांच्या अडचणी वाढल्या, मुंबई बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी राज्य सरकारकडून चौकशीचे आदेश
- मार्कंडेय काटजूंचे वादग्रस्त वक्तव्य; हाथरस प्रकरणाचं फोडलं बेरोजगारीवर खापर
- उत्तर प्रदेशातील गुंडा राजमध्ये महिला सुरक्षित नाहीत- यशोमती ठाकूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
