🕒 1 min read
नवी दिल्ली : अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना करोनाची बाधा झाली आहे. ट्विटरद्वारे ट्रम्प यांनी ही माहिती दिली आहे. त्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांची खासगी सल्लागार होप हिक्स यांना करोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: ला क्वारंटाइन केले होते. त्यांच्यासह त्यांच्या पत्नी मेलानियादेखील क्वारंटाइन झाल्या आहेत.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. ट्रम्प यांची खासगी सल्लागार होप हिक्सला करोनाची बाधा झाल्याचे समोर आल्यानंतर ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया यांनी गुरुवारी रात्री क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला. होपला करोनाची लागण झाली असल्याचे समोर आल्यानंतर या दोघांनीही करोना चाचणी करून घेतली. त्याचा अहवाल समोर आल्यानंतर ट्रम्प यांनी ट्विट करून आपल्याला करोनाची लागण झाली असल्याचे म्हटले आहे.
होप हिक्सला करोनाची बाधा झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केले होते. होप हिक्स करोनाबाधित असल्याचे समोर आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केले. अतिशय मेहनतीने काम करणाऱ्या होप हिक्सला करोनाची लागण होणे हे धक्कादायक आहे. मेलेनिया आणि मी करोना चाचणी केली असून अहवालाची प्रतिक्षा असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.
Wishing my friend @POTUS @realDonaldTrump and @FLOTUS a quick recovery and good health. https://t.co/f3AOOHLpaQ
— Narendra Modi (@narendramodi) October 2, 2020
डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना झाल्याची माहिती कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत ट्रम्प यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलेनिया लवकर बऱ्या व्हाव्यात. त्यांना चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा.
महत्वाच्या बातम्या
- पुण्यात युवा सेना नेत्याची तीक्ष्ण हत्यारांनी वार करून हत्या
- ‘देशात अराजक माजलं आहे,राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याबाबत जे घडलं ते दुर्देवी’
- मुंबई इंडियन्सचा नाद खुळा;किंग्ज इलेव्हन पंजाबचा दारूण पराभव करत गाठले अव्वल स्थान
- विवेक रहाडे यांच्या कुटुंबियांची नरेंद्र पाटील यांनी घेतली भेट,पीडित कुटुंबियांचे सांत्वन केले
- महिला सशक्तीकरणासाठी भारताचे कायदे सशक्त आणि सक्षम आहेत : स्मृती इराणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
