Share

पुण्यात युवा सेना नेत्याची तीक्ष्ण हत्यारांनी वार करून हत्या

Published On: 

पुणे : शिवेसेनेचे पुण्यातल्या कसबा विभागाचे प्रमुख दीपक मारटकर यांची गुरुवारी रात्री हत्या करण्यात आली. ही हत्या राजकीय वैमनस्यातून झाल्याचा संशय असल्याचं पोलिसांनी म्हटलंय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक विजय मारटकर यांचा मुलगा दिपक त्याच्या काही सहकाऱ्यांसोबत कार्यालयाबाहेर उभा असताना त्याच्यावर हा प्राणघातक हल्ला झाला. शुक्रवार पेठेतील गवळी आळी येथे मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास दिपक आणि त्याचे काही सहकारी कार्यालयाबाहेर थांबले होते. त्यावेळी पाच ते सहा जणांनी दिपकवर धारदार शस्त्राने सपासप वार केले.

काही कळण्याच्या आतच दीपक रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला.जखमी अवस्थेतच दिपकला तातडीने जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दिपकला डॉक्टरांनी मृत घोषित केले. हा हल्ला का करण्यात आला यामागील नेमके काय कारण आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही. दरम्यान आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने हल्लेखोरांपर्यंत पोहोचता येईल का याचा तपास पोलीस करत आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!