Share

‘तू माझ्या मुलीसारखी आहेस, तू घाबरु नको’ ; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे पायल घोषला आश्वासन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेत्री पायल घोष यांच्यासोबत दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी गैरकृत्य केल्याची तक्रार पायलने पोलिसांकडे केली आहे. त्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अद्याप अनुराग कश्यप यांची चौकशी केली नाही. येत्या सात दिवसांत मुंबई पोलिसांनी अनुराग कश्यप यांच्यावर कोणती कारवाई केली नाहीतर मुंबईत रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा काल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला होता.

तर आज रामदास आठवले यांनी अभिनेत्री पायल घोषसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे.रामदास आठवले, पायल घोष आणि भगतसिंह कोश्यारी यांनी जवळपास अर्धा पाऊण तास चर्चा केली. यावेळी रामदास आठवले यांनी पायल घोषला सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी राज्यपालांकडे केली. त्यावर राज्यपालांनी मी याबाबत गृहमंत्र्यांशी बोलतो, असं सांगितलं आहे.

“राज्यपालांशी आम्ही जवळपास अर्धा तास चर्चा केली. पायल घोष यांच्यावर काही वर्षांपूर्वी अत्याचार झाला होता. त्याबाबत तिने ओशिवरा पोलिसात तक्रारही दाखल केली आहे. मात्र, अद्याप अनुराग कश्यपची चौकशी झाली नाही. त्यामुळे मी यासंदर्भात राज्यपालांना निवेदन दिले आहे,” असे रामदास आठवले यांनी सांगितले. तर, “तू माझ्या मुलीसारखी आहेस, तू घाबरु नको, तुला पूर्ण सुरक्षा मिळेल,” असे आश्वासनही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पायलला दिले.

पायल घोषने मानले आठवलेंचे आभार!

माझ्या जीवाची आणि इज्जतीची पर्वा न करता मी अनुराग कश्यप विरुद्ध तक्रार केली आहे. माझ्या जीवाला धोका आहे. माझ्या या संकटकाळात केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले आणि रिपब्लिकन पक्ष माझ्या पाठीशी उभा राहिल्याने मला हिम्मत मिळाली आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानत असल्याचे अभिनेत्री पायल घोष म्हणाली आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!