Share

‘उद्धव ठाकरे जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री, त्यांना कोणी जाब विचारू शकत नाही’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासावरून बॉलीवूडमध्ये खळबळ माजली आहे. तर दुसरीकडे या तपासावरूनच सुरु झालेला अभिनेत्री कंगना रानौत आणि शिवसेनेचा वाद अजूनही मिटला नसल्याचे दिसून येत आहे. कंगनाने मुंबई पोलीस आणि तपास व्यवस्थेवर आवाज उठवल्यानंतर शिवसेनेनं या वादात उडी घेतली. अभिनेत्री कंगनाच्या आरोपांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केल्यान्नात्र हा वाद इतका पेटला की कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख देखील केला.

याच काळात कंगनाच्या कार्यालयावर बीएमसीने कारवाई करत त्याचे तोडकाम देखील केले. उच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर या पाडकामाला स्थगिती दिल्याने तिला काहीसा दिलासा मिळाला होता. सद्या या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. आता मुंबईत गुंडाराज चालू असल्याचा आरोप करत कंगनानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री असा उल्लेख करत टीका केली आहे. साहिल चौधरीला अटक केल्यानंतर कंगनानं ट्विट केलं असून, काँग्रेसला सवाल केला आहे.

काय आहे साहिल चौधरी प्रकरण ?

यू-ट्यूबर साहिल चौधरी यानं महाराष्ट्र सरकारवर टीका केली होती. या प्रकरणात साहिल चौधरीला अटक करण्यात आल्यानंतर कंगनानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. “मुंबईत हे काय गुंडाराज सुरू आहे. जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यंत्र्यांना व त्यांच्या टीमला कुणीही प्रश्न विचार नाहीये. त्यांनी आमच्यासाठी काय केलं? आमचं घर तोडलं आणि आम्हाला मारलं? याला उत्तरदायी कोण आहे, असा प्रश्न कंगनाने विचारून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे.

“साहिलनं महाराष्ट्र सरकारला त्यांच्या कामावरून प्रश्न विचारले म्हणून कुणीतरी त्यांच्याविरोधात अचानक गुन्हा दाखल केला, जो की त्याचा लोकशाही अधिकार आहे. त्यानंतर साहिलला तात्काळ तुरूंगात टाकण्यात आलं. पण, पायल घोषनं अनुराग कश्यपविरोधात अनेक दिवसांपूर्वी गैरकृत्याचा गुन्हा दाखल केला आहे. पण, तो मुक्तपणे फिरतोय. हे सगळं काय आहे,” असा सवाल कंगनानं काँग्रेसला केला आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!