Share

संसद सदस्य अशोभनीय वागले नसते तर कदाचित पवारांना उपवास घोषित करावा लागला नसता : फडणवीस

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रपरिषदेतून कुठेही कृषी विधेयकाला विरोध केलेला नाही. राज्यसभेत अशोभनीय वर्तवणूक करणार्‍या खासदारांवर करण्यात आलेल्या कारवाई संदर्भात त्यांनी विरोधी पक्षाला सर्मथन दिले आहे.

परंतु, राज्यसभेत हे संसद सदस्य अशोभनीय वागले नसते तर कदाचित पवारांना उपवास घोषित करावा लागला नसता, असा पलटवार राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.  कारवाई करण्यात आलेल्या खासदारांचे वागणे अशोभनीयच होते, याबद्दल कुणाच्याही मनात शंका नाही, असेही ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील एम्स आणि मेयो रुग्णालयाला भेट घेऊन कोरोना संदर्भातील आढावा घेतला. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. दरम्यान, राज्यसभेत प्रचंड गोंधळात कृषी विधेयक पारित झाले. विधेयकावर चर्चेनंतर कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर उत्तर देत असताना विरोधकांनी गोंधळ घातला. गोंधळातच विधेकाला मंजुरी देण्यात आली. यावेळी विरोधक हे सभापतीच्या समोरील वेलमध्ये उतरले.

तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी थेट सभापतीसमोर जाऊन सभागृह नियमावली पुस्तिकाच फाडली.विरोधकांकडून कृषी विधेयकाचा जोरदार विरोध करण्यात आला. यानंतर काँग्रेसकडून आंदोलन सुरू करण्यात आले. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात विधेयकावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडणे सुरू झाले.

दरम्यान, राज्यसभेत गैरवर्तन करणार्‍या खासदारांवर कारवाई करण्यात आली. मंगळवारी शरद पवार यांनी पत्रपरिषद घेत यासंदर्भात भूमिका स्पष्ट करत एक दिवसीय उपोषणाची घोषणा केली. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!