🕒 1 min read
जालना/प्रतिनिधी- छत्रपती शिवाजी महाराज ही संपूर्ण देशाची अस्मिता असून कर्नाटक येथील बेळगाव मध्ये मनगुत्ती येथील शिवरायांचा पुतळा सन्मानपूर्वक पुन्हा बसवण्यात यावा त्याचबरोबर शिवरायांचा पुतळा हटवण्यासाठी प्रयत्न करणारे काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्यासह उपस्थित असणारे आणि पुतळा हटविण्यास कारणीभूत असणारे सर्व शासकीय अधिकारी यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत अशी मागणी भाजपा नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे
काँग्रेसचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी गावातील पंच आणि पुतळा कमिटीच्या लोकांबरोबर मग मिटिंग घेऊन पंधरा दिवसानंतर निर्णय घेऊ असे सांगत स्थानिक तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांच्या उपस्थितीत शिवरायांचा पुतळा पाठवला आहे ही बाब अत्यंत खेदजनक आहे छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते त्यांना कोणत्याही जातीपातीच्या किंवा पक्षाच्या बंधनात अडकून नका असेही लोणीकर यावेळी म्हणाले
छत्रपती शिवरायांचा पुतळा सन्मानपूर्वक त्याच ठिकाणी पुन्हा बसवला जावा अन्यथा शिवप्रेमी संबंधित आमदार आणि पुतळा हटवण्याच्या कटामध्ये सामील असणाऱ्या सर्व व अधिकाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत या काँग्रेस आमदारासह सदरील प्रकारास जबाबदार असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी देखील यावेळी लोणीकर यांनी केली.
दरम्यान,छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याच्या प्रकरणानंतर आता कर्नाटक प्रशासनाकडून ८ दिवसात परवानगी देऊन पुतळा बसवण्याचे आश्वासन देण्यात आले आहेत. ८ दिवसात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला नाही तर ९ व्या दिवशी गावकरी पुतळा बसवणार असल्याचा निर्णय पोलीस प्रशासन, सामाजिक संघटना आणि ग्रामस्थांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –
मोठी बातमी: अंतिम वर्ष परीक्षाप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

