🕒 1 min read
दिल्ली: गेले काही दिवस देशभरात दररोज ५० ते ६० हजारांच्या वर रुग्णांची वाढ होताना दिसत होती. त्यामुळे हि चिंतेची बाब मानली जात होती. काल देखील हा आकडा ६० हजारांच्या पुढे राहिलेला दिसला. काल, ९ ऑगस्ट रोजी ६४ हजार ३९९ नव्या रुग्णांना कोरोना संसर्गाची लागण झाल्याचे समजते. तर, सद्या भारतासाठी एक दिलासादायक वृत्त देखील समोर येत आहे.
कोरोना संसर्गाच्या बाबतीत भारत आता तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, आरोग्य मंत्रालयाने काहीशी दिलासा देणारी माहिती समोर आणली. भारतात आतापर्यंत १५ लाख रुग्णांनी कोरोनावर मात केली असून हि महामारी लवकरच नियंत्रणात येईल असे ट्विट देखील आरोग्य मंत्रालयाने केले आहे. तसेच, अजूनही या संसर्गाचे प्रमाण १० राज्यात जास्त असल्याचे दिसून आले आहे. या १० राज्यांतूनच रोजच्या रुग्णसंख्येच्या ८०% नवे रुग्ण आढळून येत आहेत. तर, हि वाढती संख्या देखील लवकरच नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं यावेळी आरोग्य मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं आहे.
मोठी बातमी: अंतिम वर्ष परीक्षाप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी
India's #COVID19 recoveries cross the 15 lakh mark. Infection still remains concentrated in 10 states that contribute more than 80% of the new cases: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/0sYYaolYoC
— ANI (@ANI) August 10, 2020
देशात सध्या एकूण कोरोना रुग्णांचा आकडा हा २१ लाख ५३ हजारांच्या वर गेला आहे. त्यापैकी ६ लाख २८ हजार ७४७ रुग्णांवर उपचार सुरु असून ४३ हजार ३७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल, दिवसभरात देशात ८६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख १५ हजार ३३२ इतकी झाली आहे. सध्या राज्यात १ लाख ४५ हजार ५५८ ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
विजयदुर्ग: खासदार संभाजीराजेंनी केली किल्ल्यावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

