Share

भाजपा बिहार निवडणुकीचे रणशिंग फुंकणार ! अमित शाह यांची आज ऑनलाइन सभा

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत भाजपकडून आज आगामी विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज एक व्हर्च्यअल रॅली घेणार असून त्यासाठी बिहारच्या सर्व जिल्ह्यात मिळून तब्बल 72 हजार एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. या रॅलीपासून राजकारणातील व्हर्च्युअल सभांचा नवा प्रयोग सुरू करण्यात आला आहे.

#व्यक्तिविशेष : अवघ्या १८ वर्षांच्या ‘या’ गायीकेला आकाशवाणीने केलं ९९ वर्षासाठी करारबद्ध

जवळपास पाच लाख भाजपा कार्यकर्ते शाह यांचे मार्गदर्शन यूट्युब, फेसबुक लाईव्ह आणि नमो अ‍ॅपच्या माध्यमातून ऐकतील, असा भाजपाकडून दावा करण्यात आला आहे. बिहारमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या अनुषंगाने भाजपा या ऑनलाइन मेळाव्यातून निवडणुकीचे रणशिंगच फुंकणार आहे.

#corona : औरंगाबादमध्ये ६४ जणांना कोरोनाची बाधा; आता कोरोनाबाधितांची संख्या दोन हजार पार

बिहार भाजपाचे अध्यक्ष डॉ. संजय जयस्वाल यांनी याविषयी, शाह यांची व्हर्च्युअल रॅली ही कार्यकर्त्यांना डिजिटली मार्गदर्शन करण्याचा मार्ग असल्याचे म्हटले आहे. तर भाजपा प्रवक्ते निखील आनंद यांनी सांगितले की, रविवारी होणारी व्हर्च्युअल रॅली ही कार्यकर्त्यांना बुथपर्यंत पोहचवण्यासाठी दोन महिन्यांपासून आम्ही करत असलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा असेल. बिहार भाजापमध्ये संघटनात्म संरचनेत ४५ संघटनात्मक जिल्ह्ये, १ हजार १०० मंडळ, ९ हजार शक्ती केंद्र आणि ७२ हजार बुथ यांचा समावेश आहे.

दरम्यान, भापजाकडून हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहे. देशावर कोरोनाचे संकट ओढावलेले असताना व राज्यात करोनाचे रुग्ण वाढत असताना भाजपाला मात्र निवडणुकीतच जास्त रस असल्याचा आरोप काँग्रेससह विरोधी पक्षाकडून करण्यात आलेला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!