Share

#corona : औरंगाबादमध्ये ६४ जणांना कोरोनाची बाधा; आता कोरोनाबाधितांची संख्या दोन हजार पार

Published On: 

औरंगाबाद : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढत आहे. रविवारी (दि.७) औरंगाबाद जिल्ह्यात ६४ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या २०१४ झाली आहे. यापैकी ११८६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. नव्या आणि कोरोनामुक्त भागात शिरकावाचे सत्र सुरूच असून बाधितांचा आकडा दोन हजाराच्या पार गेला आहे. मृत्यूचा आकडा शंभरीच्या घरात पोहचत आहे. आतापर्यंत ९९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

औरंगाबाद शहरातील दिलासादायक गोष्ट हि कि, करोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्कय़ाहून अधिक आहे. आजारातून बरे झालेल्या व्यक्तींची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आतापर्यंत ११८४ जणांना करोनावर मात केली आहे. तर उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या सातशेपार गेली आहे. ७३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर आज आढळलेल्या रुग्णांमध्ये २७ महिला आणि ३७ पुरूष रूग्णांचा समावेश आहे.

शनिवारी औरंगाबाद शहरातील हर्सूल कारागृहातील परिसरात पण २९ जणांना करोनाबाधा झाली आहे. करोना विषाणूची लागण तपासणीसाठी कारागृहातील ११० कैद्यांच्या लाळेचे नमुने तपासण्यात आले होते. त्यातील २९ जणांना लागण झाली आहे. महापालिकेच्या आरोग्य अधिकारी नीता पाडाळकर म्हणाल्या “कारागृह बंद असताना विषाणू पोहोचला कसा, याचा शोध घेण्यासाठी कोणत्या सकारात्मक व्यक्तीच्या संपर्कात कोणते कर्मचारी आले होते, हे तपासण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे”. शहरातील कारागृहाची क्षमता ५७९ एवढी असून सध्या औरंगाबादमधील हार्सूल करागृहात १८०० कैदी आहेत.

कोरोना उपचारांसाठी रेमडेसिवीरची १० हजार इंजेक्शन्स खरेदी करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

दिलासादायक ! कोरोनाचा रिकव्हरी रेट 39.62% : चौथ्या लॉकडाऊनपर्यंत दरात लक्षणीय वाढ

विधानपरिषद निवडणूक : राज्यात पुन्हा रंगणार सरकार विरुध्द राज्यपाल सामना ?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!