🕒 1 min read
नागपूर – राज्यासह देशभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या प्रचंड वाढल्याने आरोग्य व्यवस्था कोलमडून गेली आहे. कुठे रुग्णांना बेड्स मिळत नाहीयेत तर कुठे ऑक्सिजन आणि रेमडेसीवीर सारखी इंजेक्शन्स मिळत नसल्याचे चित्र आहे. अपुऱ्या पडणाऱ्या आरोग्य व्यवस्थेमुळे अनेकांचा प्राणास मुकावे लागत आहे.
नागपुरातील ८५ वर्षांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक नारायण दाभाडकर यांचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले आहे. मात्र मृत्युपूर्वी त्यांनी केलेला त्याग आज अनेकांना प्रेरणा देणारा ठरणार आहे. भारतीय जनता पार्टी युवा मोर्च्याच्या नेत्या शिवानी दानी यांनी या संदर्भात पोस्ट करून दाभाडकर यांच्या त्यागाची कहाणी प्रकाशात आणली आहे.
शिवानी दानी यांची फेसबुक पोस्ट
मला परवा एक जण भेटला, म्हणाला माझ्या भावासाठी वॅक्सीन ची सोय होते का? म्हंटले कि बॉस, आधार पाठव तर तो ४३ चा होता. मी म्हंटलं कि यार ७ दिवसात सुरु होईल तेव्हा घे. तुझा भाऊ ना फ्रंट लाईन वर्कर आहे, ना काही आहे ना काही आहे. माझ्या एकंदरीत नकारत्मक सुरानंतर त्याने काढता पाय घेतला आणि असे आमचे संभाषण चालू होताच संपले. सांगायचे तात्पर्य हे कि आपल्या आजू बाजूला असे अनेक जण आहे कि जे केवळ आणि केवळ स्वार्थ बघतात त्यात नैतिकता, नियम सगळे सगळे धाब्यावर बसवतात आणि मुख्य म्हणजे त्याचे त्यांना काहीही वाटत नाही. आणि इथेच एक सणक डोक्यात जाते.
त्याच्या विरुद्ध बाजूला मात्र एक ८५ वर्षाचे सद् गृहस्थ, ज्यांनी लहानपणी प्रत्येक रॅली किव्वा सभांना आम्हा सगळ्या लहान मुलांना चॉकलेट देऊ केलेत. आणि त्यांना कधीही भेटले तरी त्यांच्या खिश्यात चॉकलेट पाण्याचे पाऊच, बाटली असायचीच, माझ्या एका मैत्रिणीचे (मोठ्या ताईचे) वडील होते ते पण आम्हाला त्यांचं अप्रूप वाटायचं ते चॉकलेट वाले काका म्हणून. उन्हात केवळ लहान मुलेच काय तर अगदी मोठे मोठे सुद्धा त्यांची आठवण काढायचे आणि कधी कधी तर थेट मंचावरून सुद्धा त्यांची आठवण केली जाई कारण उन्हात त्यांच्या चॉकलेटचाच सहारा असायचा. चॉकलेट ची आठवण तर एक खूप छोटी गोष्ट जी मी स्वतः अनुभवली आहे, पण त्यांच्या परोपकाराच्या गोष्टी बरेच सावित्रीविहार मधले आणि शहरातले लोक सांगू शकतील.
कोरोनाच्या ह्या महामारीत, ते सुद्धा अडकलेच. ताईने प्रचंड ओळख पाळख वापरायचा प्रयत्न केला पण आभाळच फाटले होते, त्याला कुठलाही नेता, समाजसेवी शिवण्याचा प्रयत्न करून सुद्धा काही शक्य होत नव्हते, तिला इंदिरा गांधी रुग्णालयात एक बेड मिळाला. काकांचे ऑक्सिजन एव्हाना ६० च्या खालती पोहोचले होते. ऑक्सिजन बेड शिवाय पर्याय नव्हता. एम्ब्युलन्स मध्ये त्यांना दवाखान्यात नेण्यात आले, ताई स्वतः कोरोना पॉझिटिव्ह होती, तिचे सासरे पॉझिटिव्ह होते त्यामुळे त्यांच्याकडे बघणे सुद्धा महत्वाचे होते आणि म्हणून ती काही दवाखान्यात ऍडमिट करायला जाऊ शकली नाही. ताईच्या लहान जावयाने ऍडमिट केले. काकांना श्वास लागला होता पण ते पूर्ण शुद्धीवर होते. स्वतः एम्ब्युलन्स मधून उतरून ते दवाखान्यात चालत गेले. एडमिशन ची प्रोसेस लहान जावयानी केली, आणि काकांना बेड मिळाला. उपचार सुरु झाले. एव्हाना काकांच्या नजरेस एक दाम्पत्य पडले, ज्यात चाळीशीत असलेल्या नवर्याच्या बेड साठी बायको जीवाचे रान करत होती, रडत होती पण बेड काही उपलब्ध होईना. अश्यात एक स्वयंसेवक काय करू शकतो??
काका डॉक्टरांना म्हणाले, मी ८५ चा आहे, माझे जे काही आयुष्य होते ते झाले आहे, ह्या तरुणाचे वाचणे जास्त महत्वाचे आहे, मला बेड नको तुम्ही ह्यांना द्या. जावयाने समजवण्याचा प्रयत्न केला, डॉक्टरांनी परिस्थिती सांगितली, कि तुम्हाला आता उपचार खूप महत्त्वाचे आहे आणि पुन्हा बेड मिळेल का माहित नाही, काकांनी ताईला फोन केला आणि सांगितले मी घरी येतो, तेच उचित आहे. ताई पण शेवटी ह्याच काकांची मुलगी… ज्या बापासाठी आकाश पाताळ एक करून बेड मिळवला ते म्हणतात कि बेड नको ह्याला काय अर्थ आहे…. पण तिने सुद्धा ते समजले, डॉक्टरांना कन्सेंट लिहून दिला कि आम्ही आमच्या मर्जीने जात आहोत, जावई त्यांना घरी घेऊन आले.
दोन दिवस तग धरला आणि तिसऱ्या दिवशी घरीच अनंतात विलीन झाले.आयुष्यभर परोपकार केलेला स्वयंसेवक शेवटी सुद्धा एक महत्वाचे कार्य करून जातो ह्याला शब्दात बांधणे शक्यच नाही.
कोरोना खूप भयंकर गोष्टी दाखवतो आहे,अश्यात पैसे वाले, सो कॉल्ड सुसंस्कृत म्हणवून घेणारे कसे वागतात हे बघायला मिळते आहे, कि वॅक्सीन नियमबाहेर घेतील, गरज नसताना ऑक्सिजनचा साठा करवतील, रेमडेसीवीर स्टॉक करून ठेवतील आणि दुसरी कडे हे असे दाभाडकर काका कि शेवटच्या क्षणाला सुद्धा परोपकार करून जातात. त्यांच्यातले ५% गुण पण आत्मसात करू शकलो तर खरी श्रद्धांजली ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना रोखण्यास ठाकरे सरकार अपयशी, गिरीश महाजनांची टीका
- अपूर्ण तयारीमुळे जिल्हाधिकाऱ्यांवर भाजप खासदार, आमदार संतापले
- कोरोनाच्या साथीतही मिळतिये गावकऱ्यांची साथ! कुसळंब येथे उभारले ५१ खाटांचे कोविड केअर सेंटर
- ऑनलाईन‘ परीक्षेपुर्वी ‘मॉकटेस्ट‘ द्यावी लागणार, बुधवारपासून चार दिवस मॉक टेस्ट
- Breaking : सोनिया गांधींचा थोरातांना फोन; महाराष्ट्रातील स्थितीबाबत केली महत्वाची चर्चा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
