नवी दिल्ली : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे.
गेल्या 24 तासात देशात 4,01, 993 नव्या रुग्णांची भर पडली असून 3,523 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. शुक्रवारी देशात जवळपास तीन लाख रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. त्या आधी गुरुवारी देशात 3.86 लाख रुग्णांची भर पडली होती. कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जगभरातील एकाच दिवशी वाढणाऱ्या रुग्ण संख्येपैकी 40 टक्के रुग्णसंख्या ही एकट्या भारतात वाढत असल्याचं समोर आलं आहे.
देशात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येसह ऑक्सिजन तुटवड्याचं संकटही वाढत चाललं आहे. ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू होतो आहे. दिल्लीतील एकाच रुग्णालयात ऑक्सिजनअभावी तब्बल 8 जणांचा जीव गेला आहे. यामध्ये एका डॉक्टरचाही समावेश आहे. रुग्णालयाने दिल्ली हायकोर्टात ही माहिती दिली आहे. कोरोनाच्या सध्याच्या एकंदर परिस्थितीबाबत दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी बत्रा रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या रुग्णालयातील परिस्थिती गंभीर आहे, हे सांगितलं. ऑक्सिजनचं संकट वाढलं आहे. ज्यामुळे आठ जणांचा जीव गेला आहे. यात एका डॉक्टरचाही समावेश आहे, असं बत्रा हॉस्पिटलने कोर्टात सांगतिलं.
महत्वाच्या बातम्या
- जि.प. स्थायी समिती बैठक: ऑफलाईन प्रमाणे ऑनलाईन सभेतही सदस्यांचा गोंधळ!
- शेतीच्या वादातून चौघांची मारहाण
- जून्या भांडणाच्या कारणावरून प्राणघातक हल्ला करणाऱ्याचा जामीन अर्ज फेटाळला
- एका लग्नाची अशीही गोष्ट! विवाहाच्या रात्रीच करवलीसह नवरी फरार
- माजलगावात व्यापाऱ्यांचा ‘उघडझाप’ कार्यक्रम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

