औरंंगाबाद : जून्या भांडणाच्या कारणावरून तरुणावर चाकूने प्राण घातक हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याप्रकरणी शेख मोबीन शेख अजिज (वय २५, रा. गल्ली नं.१०, मिसारवाडी) याने सादर केलेला नियमीत जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.एन. पाटील यांनी फेटाळला.
प्रकरणात सुलतान अली चाउस (वय ५९, रा. मिसारवाडी) यांनी फिर्याद दिली. त्यानूसार, चाउस यांना पाच मुले असून तीसऱ्या क्रमांकाचा मुलगा तालेब सुलतान बिन हवेल (वय २१) हा मागील दोन महिन्यांपासून पुणे येथे नूर ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये काम करतो. १४ फेब्रुवारी तो औरंगाबादला आला.
सांयकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास चाउस यांचा मोठा मुलगा नासेर याला दवू नावाच्या व्यक्तीने फोन करुन तालेब सुलतान याला मिसारवाडी येथील एका ढाब्याजवळ काही व्यक्तींनी मारहाण केल्याची माहिती दिली व जखमी तालेब याला सिडको पोलीस ठाण्यात आणले. माहिती मिळताच चाउस पोलीस ठाण्यात पोहचले.
त्यानी तालेबला विचारणा केली असता, जुन्या भांडणाच्या कारणावरुन आरोपी शेख मतिन उर्फ मत्या, हसन पटेल आणि शेख मोबीन शेख अजिज यांनी चाकूने वार करुन गंभीर जखमी केल्याचे सांगितले. प्रकरणात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘माझ्या कारकीर्दीत मी नेहमीच असा कारनामा करण्याचा प्रयत्न केला पण…’ सेहवाग कडून पृथ्वी शॉचं कौतुक
- ‘महाविकास आघाडीची शेतकऱ्यांच्या बांधावर बि – बियाणे योजना हवेत विरली’
- ‘बचपन के बिछडे आयपीएलमे मिले’ अनुष्का शर्मा आणि साक्षी धोनी होत्या ‘स्कूलमेट’
- एवढा बेजबाबदार पंतप्रधान जगात आतापर्यंत कुठेच झाला नाही-पटोले
- मोठी बातमी : भारतातून ‘या’ देशात गेल्यास 5 वर्षांचा कारावास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

