औरंगाबाद : शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांसाठी जिल्हा परिषद सदस्यांनी आपापल्या गटातील गावातील शाळा, मंगल कार्यालयांमध्ये तात्पुरते क्वारंटाईन सेंटर सुरू करावे, अशा सूचना जि.प. स्थायी समिती बैठकीत अध्यक्षा मीना शेळके यांनी दिल्या. मात्र ऑनलाईन सभेत अनेकांचे माईक सुरूच असल्याने गोंगाट झाला. सर्वानी आपले माईक बंद करा, अशा सूचना वारंवार देऊनही कोणीही न एेकल्याने नेहमीप्रमाणे यावेळी देखील गोंधळ पाहायला मिळाला.
जिल्हा परिषद स्थायी समितीची बैठक शुक्रवारी (दि.३०) रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने झालेल्या बैठकीत दिल्या. जि.प. अध्यक्षा मीना रामराव शेळके यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी ऑनलाईन बैठक घेण्यात आली. या सभेत ग्रामीण भागात वाढणार्या कोरोनावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागामध्ये कोरोनाबधितांची संख्या वाढत असल्याबद्दल सदस्यांनी चिंता व्यक्त केली.
सभेत सहभागी सदस्यांनी आरोग्यसेवेबाबत सूचना केल्या. जिल्हा परिषद सदस्यांनी आपापल्या गटातील मोठ्या गावांमध्ये रुग्णसंख्या लक्षात घेऊन ग्रामपंचायत व स्थानिकांना विश्वासात घेऊन शाळा, मंगल कार्यालये किंवा उपलब्ध असलेल्या जागेमध्ये क्वारंटाईन सेंटर सुरू करावे, असे आदेश जि.प. अध्यक्षा मीना शेळके तसेच आरोग्य सभापती अविनाश गलांडे पाटील यांनी दिले. जिल्हा परिषद सदस्यांनी गावा-गावांत जाऊन लसीकरण, उपचारासंदर्भात तसेच कोरोना चाचणीसंदर्भात जनजागृती करावी, असेही आवाहन यावेळी करण्यात आले.
तसेच रेमडेसिवीर इंजेक्शन आता रुग्णालयातच मिळणार आहे, तशी मागणी रुग्णालयाला नोंदवावी लागणार असल्याचे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदवले यांनी सांगितले. बैठकीत केशवराव तायडे, रमेश पवार, शिवाजी पाथ्रीकर, मधुकर वालतुरे, रमेश गायकवाड, जितेंद्र जैस्वाल आदींनी ऑनलाइन सहभाग घेऊन सूचना केल्या.
ब्रेक द चेन अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व अास्थापना बंदचे आदेश असतांनाही अनेक गावांमध्ये दुकाने, टपर्या बिनधास्तपणे उघड्या राहतात. त्या ठिकाणी ग्रामस्थ गर्दी करतात. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. याकडे काही सदस्यांनी लक्ष वेधले असता, सध्या कडक निर्बंध आहेत. त्यामुळे संबंधित गावातील सरपंच, ग्रामसेवकांकडे तक्रारी कराव्यात आणि संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, असे आदेश जि.प. आरोग्य सभापती अविनाश गलांडे यांनी सभेतून दिले.
महत्त्वाच्या बातम्या
- माजलगावात व्यापाऱ्यांचा ‘उघडझाप’ कार्यक्रम
- कोरोनाची संभाव्य तिसरी लाट गृहीत धरून काटेकोर नियोजन करा – अजित पवार
- एका लग्नाची अशीही गोष्ट! विवाहाच्या रात्रीच करवलीसह नवरी फरार
- कोरोनाविरुद्धच्या लढ्यात शिखर धवनने ‘Mission Oxygen’साठी केली २० लाखांची मदत
- गंभीर! ऑक्सिजनचे रिकामे सिलेंडर लावल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांचा घाटीत घेराव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

