Share

माजलगावात व्यापाऱ्यांचा ‘उघडझाप’ कार्यक्रम

Published On: 

बीड: कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता जिल्ह्यात आता चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे. सर्वत्र कडक निर्बंध लावले असले तरी देखील नागरिक नियमांचे पालन करत नसल्याचे निदर्शनास येत आहे. संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवांची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत तसेच अत्यावश्यक सेवांचे दुकाने सुरु ठेवण्याची देखील ठराविक वेळ ठरवून दिली आहे, मात्र तरी देखील मागच्या दाराने काही दुकानदार आपली दुकाने सुरु ठेवत असल्याचे दिसून आले आहे.

लॉकडाऊन काळात अनेक व्यापाऱ्यांनी पाठीमागून, समोरून दुकाने उघडून व्यवसाय केला. माजलगाव येथील अत्यावश्यक सेवांची दुकाने वगळता इतर सर्व व्यावसायिकांनी कोविडच्या काळात आपले प्रतिष्ठाने पूर्णतः बंद ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे. कोविड वर मात करणे ही सामुहिक जबाबदारी असून ती निभावण्याचे आवाहन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेंद्र रेदासणी यांनी केले आहे.

लॉकडाऊन काळात अनेक व्यापाऱ्यांनी पाठीमागून, समोरून दुकाने उघडून व्यवसाय केला. त्यामुळे पोलिस प्रशासनाला कारवाई करावी लागली. लॉकडाऊन आपल्या सुरक्षेसाठी आहे हे लक्षात घेऊन आपले व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवून घरी बसून आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. जे कुणी व्यापारी लॉकडाऊन काळात प्रशासनाच्या नियमा विरोधात जाऊन दुकाने उघडून व्यवसाय करतील त्यांनी पुढील होणाऱ्या परिणामाची जबाबदारी घ्यावी. त्यानंतर संघटनेला दोष देऊ नये. संकटकाळातील आपली जबाबदारी निभावत सर्व व्यापाऱ्यांनी या बंदला प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र रेदासणी यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!