औरंगाबाद : शहरात विविध भागातून तब्बल ८ मोटारसायकल चोरी झाल्याचा प्रकरण समोर आलेला आहे. गेल्या तिन दिवसात शहरातून तब्बल १९ मोटारसायकल चोरी झाल्याची तक्रार विविध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अब्दुल कलीम फारूखी (५४, रा.रोशन गेट, करिम कॉलनी) याची मोटारसायकल क्रमांक एमएच २० एझेड ६८४८ ही १३ मे रोजी सकाळी ९ ते ६.३० वाजेच्या दरम्यान चोरून नेली. या प्रकरणी उस्मानपूरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. निलेश रिखलचंद जैन (४६, रा.एन ३, सिडको) याची दुचाकी एमएच२० सीएम ७९७८ घरासमोरून अज्ञाताने ९ मे च्या रात्री चोरून नेली. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागापूर शिवरात राहणाऱ्या रामेश्वर गोरखनाथ सुकासे (१९) याची दुचाकी एमच २० ईपी ४०९८ ही अज्ञात चोरटयाने घरासमोरून १८ मेच्या रात्री चोरून नेली. याप्रकरणी वाळुज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड बायपास रोड पटेल लॉन्स येथे एका महिलेची मोपेड क्रमांक एमएच २० एफजे ८११२ ही १६ मे रोजी सकाळी १० ते दुपारी चार वाजेच्या दरम्यान अज्ञाताने चोरून नेली. या प्रकरणी सातारा पोिलस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख अफरोज शेख युसूफ (२३, रा. जयसिंगपूरा) याची दुचाकी क्रमांक एमएच २० ईपी ५५२७ ही १३ मे रोजी शहागंज येथील भाजीमंडी परिसरातून चोरून नेण्यात आले. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
तसेच लक्ष्मण काशिनाथ काकडे (२९, रा.कमळापूर, गंगापूर) यांच्या घरासमोरून त्यांची दुचाकी १० मेच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. या प्रकरणी एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे. विजय लक्ष्मण सोनवणे (४२, रा.हडको) या घाटीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची दुचाकी क्रमांक एमएच २० सीएन २६०९ ही १४ मे रोजी सकाळी १० ते दुपारी एक वाजेच्या दरम्यान कर्मचार्यांच्या पार्किंगमधून चोरून नेण्यात आली आहे. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘फोटोसेशन नव्हे तर मदतीसाठी आलोय’, रत्नागिरी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला
- ‘..म्हणून झक मारत मुख्यमंत्री ठाकरेंना कोकणात यावे लागले’, निलेश राणेंची जहरी टीका
- ‘भारत जागतिक अर्थव्यवस्थेला बळकटी देऊ शकतो’, परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांचे मत
- कोरोना आटोक्यात कसा येणार? देशातील निम्मे लोक मास्कच वापरत नाहीत
- पंतप्रधान मोदींकडून हिवरेबाजारच्या कोरोना प्रतिबंधक कामांची दखल


