Share

दिव्यांग शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू : धनंजय मुंडेंची माहिती

Published On: 

मुंबई : राज्यातील दिव्यांग शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गास राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनातून मोठी ‘गुड न्युज’ दिली आहे. विधान परिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासात मंत्री मुंडेंनी दिव्यांग शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू करण्याची अंमलबजावणी दोन महिन्यांच्या आत करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

दिव्यांग शाळा तसेच या शाळेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे कायम दुर्लक्ष केले जायचे, असा आरोप वेळोवेळी होत आलेला आहे. मात्र, धनंजय मुंडे यांच्या या घोषणेनंतर दिव्यांग शाळेत काम करणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल, असे सांगितले जात आहे.

काँग्रेस नेते भाई जगताप तसेच आमदार जयंत आसगावकर यांनी ६ वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी आलेल्या अडचणींच्या संदर्भात अधिवेशनादरम्यान प्रश्न विचारला. तसेच त्यांनी दिव्यांग शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अन्य विभागातील कर्मचाऱ्यांप्रमाणे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन मिळावे अशी मागणी केली.

त्यानंतर धनंजय मुंडे यांनी ही घोषणा केली. तसेच अधिवेशनानंतर पंधरा दिवसांच्या आत संबंधित विभागांसोबत व्यापक बैठक घेऊन हे अडसर दूर करण्यात येतील. तसेच येत्या दोन महिन्यांच्या आत सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यात येईल असेही मुंडे म्हणाले.

 

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!