Share

पोलीस दलात होणार भरती; गृहमंत्र्यांची मोठी घोषणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज विधानसभेत मोठी घोषणा केली आहे. लवकरच पोलीस दलात  7231 पदांची भरती करण्यात येणार असून त्याला मंत्रिमंडळाने मंजुरी देखील दिली आहे, अशी घोषणा वळसे पाटील यांनी केली आहे. तसेच या भरती प्रक्रियेत गैरप्रकार होणार नाही याची काळजी घेण्यात येईल, असेही वळसे पाटील यावेळी म्हणाले. त्यानंतर पुढील दोन वर्षातील भरती बाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे नेणार असून त्याला मंजुरी दिली तर आणखी पोलीस भरती होईल, असेही वळसे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे पोलीस दलात भरती होऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

यावेळी बोलताना वळसे पाटीलांनी असेही सांगितले कि राजकीय आंदोलनातील 188 चे सर्व खटले पाठिमागे घेण्याचा तत्त्वत: निर्णय घेतला आहे. हा प्रस्ताव आयुक्तांच्या माध्यमातून किंवा जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात असेल तर जिल्हाधिकाऱ्यांकडून आल्यावर केसेस मागे घेतल्या जातील. तसेच पोलीस सेवेतील शिपायाला निवृत्त होताना पोलीस निरीक्षक होण्याची संधी मिळत नव्हती. 30 वर्ष सेवा केल्यानंतर तो कॉन्स्टेबल म्हणून निवृत्त व्हायचा. पण आता तो 30 वर्षानंतर निवृत्त होताना सब इन्स्पेक्टर होईल. कोणत्याही तपासाला अधिकारी लागतात. त्यात सब इन्स्पेक्टर कमी आहेत. म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीस स्टेशन बांधणार 

राज्यातील अनेक पोलीस स्टेशनच्या इमारती जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे त्यात सुधारणा आणि नाविन्यपूर्ण सुविधा तयार करण्यासाठी 87 पोलीस स्टेशनची बांधकामे हाती घेतली आहेत. त्यासाठी लागणार निधी उपलब्ध करून दिला आहे. या संदर्भात या वर्षात मोठी तरतूद केली आहे, असेही वळसे पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!