Share

हवामानात मोठा बदल; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वातावरण राहणार कोरडे!

Published On: 

मुंबई : तापमानात मोठा बदल झाला आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तापमानात वाढ झाली. विशेषत: मुंबईकरांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत असताना पाहायला मिळत आहे. आणखी दोन दिवस ही उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तर दुसरीकडे राज्यातून अवकाळी पाऊस गायब झाला असून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रात हवामान कोरडे राहणार असण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात कोरडे वातावरण –

गेले ३ दिवस ढगाळ वातावरण आणि काही भागात अवकाळीचा कहर झाल्यानंतर सोमवारपासून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात कोरडे हवामान आहे. तर इतरत्र भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. गोवा आणि कोकणच्या तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचीत तापमानात वाढ झाली आहे. पण आता दिवसेंदिवस तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पीक काढणी कामाला वेग –

शेतकरी आता पिक काढणीला सुरुवात करतील. मध्यंतरीच्या अवकाळी आणि ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पीक काढणीला ब्रेक लागला होता. पण आता वातावरण निवळले आहे. त्यामुळे शेतकरी ज्वारीसह गहू, हरभरा काढणी कामे ही वेगात होणार आहे. अवकाळी पावसाने मराठवाड्याला साथ दिल्याने संभाव्य नुकसान हे टळलेले आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!