जळगाव : अर्थसंकल्पात महाविकास आघाडी सरकारने केळीच्या पिकाला फळाचा दर्जा देवून रोजगार हमी मध्ये सहभागी केल्याने जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे केळीची मिरवणूक काढण्यात आली. केळी उत्पादक शेतकर्यांनी केळीच्या खोडाचे पूजन करून व मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला आहे. शेतकऱ्यांच्या जल्लोषात काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही सामील झालेले पाहायला मिळाले.
गेल्या काही वर्षापासून केळीला पिकाला फळाचा दर्जा मिळावा यासाठी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी अनेक आंदोलने केली होती. केळीला फळाचा दर्जा नसल्यामुळे अस्मानी संकटात केळीच्या नुकसानाची भरपाई देखील अल्प प्रमाणात मिळत होती, त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून केळीला फळाचा दर्जा मिळावा ही मागणी प्रलंबित होती. या अर्थसंकल्पात महाविकास आघाडी सरकारने केळीच्या पिकाला फळाचा दर्जा दिला.
तसेच रोजगार हमीमध्ये केळीला समाविष्ट केल्याने केळी उत्पादक शेतकरी आनंदी झाले. आणि या पार्श्वभूमीवर रावेर येथे केळी उत्पादक शेतकऱ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात केळीच्या घडाची मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला आहे.
महत्वाच्या बातम्या –


