कीव्ह: रशिया युक्रेन युद्धाचा आज 19वा दिवस आहे. युक्रेनच्या विविध भागात रशियाचे हल्ले सुरूच आहेत. तर युक्रेनचे सैनिकही रशियन सैन्याला कडवी झुंज देत आहेत. कीव्ह प्रदेशाचे प्रमुख ओलेक्सी कुलेबा यांनी दिलेल्या माहितीत असे म्हटले आहे की, रशियन सैन्याने कीव्हच्या उपनगरांवर रात्रभर गोळीबार केला. तसेच कीव्हच्या पूर्वेकडील भागांनाही क्षेपणास्त्रे आणि तोफखान्याने लक्ष्य करण्यात आले. इरपिन, बुका आणि हॉस्टोमेलमध्ये रात्रभर बॉम्बस्फोट सुरू होते.
कीव्ह शहर ताब्यात घेण्यासाठी रशियन सैन्याने आजूबाजूच्या भागात जोरदार गोळीबार केला आहे. कीव्हला युक्रेनच्या उर्वरित भागापासून तोडण्यासाठी रशियन सैन्याने गेल्या 24 तासांत पश्चिम भागावरही हल्ले केले. युक्रेनच्या अधिकार्यांनी सांगितले की, रशियन सैन्याने अँटोनोव्ह विमान कारखान्यावर हल्ला केला असून त्यात दोन जण ठार आणि सात जण जखमी झाले.
खतरनाक चेचेन योद्धे दाखल
हे हल्ले सुरू असताना कीव्हच्या वेशीवर चेचेन योद्धे पोहोचल्याने खळबळ उडाली आहे. युक्रेनमध्ये आणखी रक्तपात करण्यासाठी रशियाने चेचेन योद्धे पाठवले आहेत. हे चेचेन योद्ध युक्रेनच्या सैन्यावर हल्ले करत आहेत. आता ते युक्रेनच्या राजधानीत नरसंहार करणार असल्याची शक्यता आहे.
बायडन आणि मॅक्रॉन यांची रशियाविरुद्ध हातमिळवणी


