Share

‘ज्याला कावीळ झालीय त्याला सर्व जग पिवळंच दिसतं’

Published On: 

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या आकस्मिक निधनाने रिक्त झालेल्या पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सुरु आहे. भाजप आणि राष्ट्रवादीने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केल्यामूळे निवडणूकीच्या रणधुमाळीची चुरस वाढली आहे.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमदेवार समाधान आवताडे यांचा प्रचार करण्यासाठी प्रवीण दरेकर आणि गोपीचंद पडळकर आज पंढरपुरात आले होते. यावेळी या दोन्ही नेत्यांनी आवताडे यांचा प्रचार करताना ठाकरे सरकारवर हल्ला चढवलाच परंतु, राष्ट्रवादीवरही घणाघाती टीका केली. पडळकर यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच भाजपची भूमिका भगीरथ भालकेंच्या विरोधात नसल्याचं स्पष्ट केलं. राज्यातील आघाडी सरकार हे विश्वासघाताने आलं आहे. त्याच्याविरोधात आमची भूमिका आहे, असं पडळकारांनी सांगितलं. त्यानंतर पडळकर ठाकरे सरकारवर जोरदार तुटून पडले होते.

यावरून आता महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. ‘ज्याला कावीळ झालीय त्याला सर्व जग पिवळंच दिसतं’ या म्हणीप्रमाणे गोपीचंद पडळकरांना या सरकारने कितीही चांगले निर्णय घेतले तरी त्यात खोटच दिसते, असं टीकास्त्र गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी सोडलंय. साताऱ्यात शंभुराज देसाईंनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

आमदार गोपीचंद पडळकर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याशिवाय दुसरं काम नाही. राज्य सरकार साडेपाच हजार कोटी रुपये महाराष्ट्रातील जनतेसाठी देतेय. तुम्ही केंद्रातून किती मदत देताय, असा सवालही गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी विरोधकांना विचारलाय. गोपीचंद पडळकरांना चांगलं काम दिसत नाही, त्यांना यामध्ये खोटं काढायचीय, पण हे सरकार सर्व बाजूने तयार आहे, असंही शंभुराज देसाई म्हणाले आहेत.

पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं २८ नोव्हेंबर रोजी निधन झालं. भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी १७ एप्रिलला मतदान होणार असून २ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!