वैजापूर : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वैजापूर तालुक्यातील परसोडा येथील माय लेकाच्या कोरोनामुळे झालेल्या मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून एकाच आठवड्यात गावात कोरोनामुळे चार रुग्णांचा मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
परसोडा गावात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. येथील अशोक जगन्नाथ पवार हे आई वडील पत्नी व दोन मुलांसह राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्या ७३ वर्षीय आई भिमाबाई जगन्नाथ पवार यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
त्यानंतर अशोक पवार व त्यांच्या पत्नीलाही त्रास सुरु झाल्याने त्यांच्यावर वैजापूरच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु होते. अशोक यांची प्रकृती खालावल्याने त्यांना देखील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारा दरम्यान सोमवारी दुपारी बारा वाजता अशोक यांची आई भिमाबाई यांचे निधन झाले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी गुढीपाडव्याला अशोक पवार यांनीही या जगाचा निरोप घेतला.
दोघांच्याही जाण्याने पवार कुटुंबाला मोठा धक्का बसला असून गावावर शोककळा पसरली आहे कोरोनामुळे आठवडाभरातच परसोडा गावात चार जणांचा मृत्यू झाला आणि गावकरी हादरले आहे. अशोक पवार यांची त्यांना आपल्या दोन मुलांना अधिकारी बनवण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र आता सर्व काही मागे सोडून ते निघून गेल्याने संपूर्ण कुटुंब एकाएकी पोरके झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पंढरपूर पोटनिवडणुकीची सभा सुप्रिया सुळेंनी गाजवली, ‘ब्रीच कँडी’च्या गेटवरुन ठोकल भाषण
- बेन स्टोक्स स्पर्धेतून बाहेर, ‘या’ चार खेळाडूंपैकी एकाची लागू शकते संघात वर्णी
- उद्धव ठाकरेंच्या आदेशाने संजय राऊत ‘या’ उमेदवाराच्या प्रचारासाठी थेट कर्नाटकात दाखल !
- नवीन फ्लॅगशिप एसयूव्ही लाँच केल्यानंतर महिंद्राच्या ‘या’ कारचे उत्पादन बंद होणार
- विद्यापीठाच्या सर्वच परीक्षा पुढे ढकलल्या, पदवीचे पेपर ३ मे पासून
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

