सिंधुदुर्ग : कोरोना संकट निवारण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज रात्री 8 वाजेपासून 1 मे पर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात 144 कलम लागू राहील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेला संबोधित करताना ही माहिती दिली आहे.
दरम्यान, या कडक निर्बंधांना भाजप नेत्यांनी विरोध केला आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे. ‘शिवभोजन सेंटर उघडी राहणार कारण शिवसेनेचे कार्यकर्ते सेंटर चालवतात, पण इतरांचे रेस्टॉरंट बंद राहणार. घराबाहेर जाऊन पार्सल घ्या, कोरोना होणार नाही. रिक्षा टॅक्सी फिरू द्या पण तुम्ही फिरू नका. मुंबईच्या बिल्डरांना मदत करताना हजार कोटी पण गरिबांना मदत करताना पाचशे-हजार.’ असा घणाघात निलेश राणे यांनी लगावला आहे.
शिवभोजन सेंटर उघडी राहणार कारण शिवसेनेचे कार्यकर्ते सेंटर चालवतात, पण इतरांचे रेस्टॉरंट बंद राहणार.
घराबाहेर जाऊन पार्सल घ्या, कोरोना होणार नाही.
रिक्षा टॅक्सी फिरू द्या पण तुम्ही फिरू नका.
मुंबईच्या बिल्डरांना मदत करताना हजार कोटी पण गरिबांना मदत करताना पाचशे-हजार.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 14, 2021
…लगेच केंद्राकडे भीकेची मागणी !
मंत्री छगन भुजबळांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींजीना लिहिलेले पत्र बघा. १ महिना गरिबांना प्रतिव्यक्ती ३ किलो गहु व २ किलो तांदुळ द्यायची घोषणा केली आणि लगेच केंद्राकडे भीकेची मागणी पण केली. उद्या पासून राज्याचे मंत्री ७.४५ ची सोय पण केंद्राकडे मागतील, काय सांगता येत नाही. pic.twitter.com/Mp7HQXqFZa
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 14, 2021
‘मंत्री छगन भुजबळांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींजीना लिहिलेले पत्र बघा. १ महिना गरिबांना प्रतिव्यक्ती ३ किलो गहु व २ किलो तांदुळ द्यायची घोषणा केली आणि लगेच केंद्राकडे भीकेची मागणी पण केली. उद्या पासून राज्याचे मंत्री ७.४५ ची सोय पण केंद्राकडे मागतील, काय सांगता येत नाही,’ असा प्रहार देखील निलेश राणे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्यात आजपासून लॉकडाऊन; काय सुरु, काय बंद ? वाचा एका क्लिकवर !
- येणारे दिवस अनिल देशमुखांसाठी कठीण असतील; भाजप नेत्याचे भाकीत
- आधी खात्यावर पैसे द्या मग लॉकडाऊन करा म्हणणाऱ्या चव्हाणांची भाषा बदलली, मुख्यमंत्र्यांना म्हणाले…
- आठवीतलं पोरगं पण सांगेल हे सरकार फार काळ टिकणार नाही – चंद्रकांत पाटील
- पंढरपूर पोटनिवडणुकीची सभा सुप्रिया सुळेंनी गाजवली, ‘ब्रीच कँडी’च्या गेटवरुन ठोकल भाषण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

