Share

राज्यात आज ७ हजार ३९१ रुग्ण झाले कोरोनामुक्त ; तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद

Published On: 

मुंबई : राज्यात दैनंदिन कोरोना बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. आज 8,010 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 391 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 59 लाख 52 हजार 440 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.17 टक्के आहे.

राज्यात आज 170 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.04 टक्के झाला आहे. तब्बल 31 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,48,24,211 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 61,89, 257 (13.81 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,81,266 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,471 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

दरम्यान सध्या देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत चालली आहे. मात्र अधूनमधून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं चिंता कायम आहे. त्यातच कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानं अनेक राज्यांनी निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणांवरील गर्दी वाढली आहे. पर्यटनस्थळीदेखील पर्यटक मोठ्या संख्येनं जाऊ लागले आहेत. याबद्दल केंद्र सरकारनं स्पष्ट शब्दांत चिंता व्यक्त केली आहे. तसेच नागरिकांना गाफील न राहता कोरोन नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!