🕒 1 min read
मुंबई : महाविकास आघाडीत धुसफूस सुरूच असल्याचे चित्र आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी २०१४ मध्ये मिळालेल्या धोक्याची आठवण करून दिली आहे. २०१४ मधील घडामोडींची आठवण करून देत पटोलेंनी थेट खा. शरद पवारांशी पंगा घेतल्याचं बोललं जात आहे. २०१४ मध्ये झाला तसा धोका होऊ नये म्हणून स्वबळाची तयारी करतो आहोत असं सांगत यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
‘आमची लाईन ठरलेली आहे. स्वबळाच्या मुद्द्यावर आम्ही कायम आहोत. कारण याआधी आम्ही अनेक धक्के सहन केले आहेत. २०१४ मध्ये मिळालेला धोका पुन्हा मिळू नये यासाठी आम्ही स्वबळाची तयारी सुरू केली आहे,’ असं नाना पटोले म्हणाले. गेले काही दिवस नाना पटोले यांच्या सातत्याच्या काही विधानांमुळे महाविकास आघाडीतील तणाव वाढत असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खुद्द शरद पवार यांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, पवारांच्या नाराजीनंतर काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी पटोले मात्र गैरहजर होते. यानंतर पटोले यांनी स्पष्टीकरण देताना शरद पवार हे महाविकास आघाडीचे रिमोट कंट्रोल असल्याचं म्हटलं. ‘ही बैठक राज्य सरकार आणि त्यातील समन्वयाबाबत होती. ही बैठक पक्षस्तरीय नव्हती. ते (शरद पवार) महाविकास आघाडीचे रिमोट कंट्रोल आहेत,’ असं विधान पटोलेंनी केलं होतं. त्यामुळे पवारांनी नाराजी वर्तवल्यानंतर पटोलेंनी वाद मिटवण्यासाठी या पहिलं पाऊल उचलल्याचं दिसून येतंय.
नानांच्या नाना तऱ्हा असतात. 'नाना सकाळी एक बोलतात', 'दुपारी दुसरेच' बोलतात आणि संध्याकाळी 'विड्रॉ' होतात!!
यामुळे त्यांचे वक्तव्य किती गांभीर्याने घ्यायचे याचा विचार आपण केला पाहिजे! pic.twitter.com/Onju1EurTn— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) July 15, 2021
यावर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पटोलेंना लक्ष्य केलं आहे. ‘नानांच्या नाना तऱ्हा असतात. ‘नाना सकाळी एक बोलतात’, ‘दुपारी दुसरेच’ बोलतात आणि संध्याकाळी ‘विड्रॉ’ होतात!! यामुळे त्यांचे वक्तव्य किती गांभीर्याने घ्यायचे याचा विचार आपण केला पाहिजे,’ असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘राज्यात विकास करणारे नाही तर वसुली करणारे सरकार’, बबनराव लोणीकर यांची टीका
- शरद पवार महाविकास आघाडीचे रिमोट कंट्रोल; नाना पटोलेंचा वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
- स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना शिवसेनेनं केली १० लाखांची मदत; एकनाथ शिंदेनी केलं कुटुंबियांच सांत्वन
- ‘मुंबई विमानतळावर ‘आवाज’ हा मराठी माणसाचाच असेल’, मनसेचा इशारा
- ‘जशी पुण्याची मस्तानी जगात भारी तसा आमचा मुख्यमंत्री जगात भारी’ ; मनसेचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
