मुंबई : शेतकऱ्याला नेहमीच नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. कधी दुष्काळी परिस्थितीशी तर कधी अतिवृष्टीशी आशा परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी शेतात पिकवलेल्या पिकाचा विमा काढणे गरजेचे आहे. कारण दुष्काळ असो अथवा अतिवृष्टी असो आशा वेळेस पिकाचे झालेले नुकसान काढलेले पीक विमातुन तरी भरून निघेल आशा अपेक्षा पोटी शेतकरी आपल्या पिकांचा खरिपाचा व रब्बीची विमा काढत असतो.
याच पार्श्वभूमीवर राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होता यावे यासाठी अर्ज करण्याची मुदत २३ जुलैपर्यंत वाढवून मिळावी अशी मागणी करणारा प्रस्ताव राज्य शासनाने आज केंद्र शासनाकडे पाठविल्याची माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली होती. हा प्रस्ताव केंद्राकडे पोहचताच त्यांनी त्वरित दाखल घेवून पिक विमा अर्ज भरण्याची मुदत वाढवून २३ जुलै पर्यंत वाढवली असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.
प्रधानमंत्री श्री @Narendramodi जी आणि कृषीमंत्री श्री @nstomar जी यांनी पंतप्रधान पिक विमा योजनेची मुदत वाढविल्या बद्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद! 23 जुलै 2021 पर्यंत ही मुदत वाढवली आहे. राज्यसरकार कडून मागणी झाल्यावर त्यावर तात्काळ निर्णय घेऊन ही मुदत वाढविण्यात आली आहे. pic.twitter.com/zbkC5WtPAU
— Raosaheb Patil Danve (@raosahebdanve) July 15, 2021
दरम्यान पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याचा आज (१५ जुलै) शेवटची मुदत होती आतापर्यंत सुमारे ४६ लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. मात्र राज्यातील काही भागात लांबलेला पाऊस, कोरोना प्रतिबंधासाठी असलेले निर्बंध यामुळे शेतकऱ्यांना मुदतीत विमा हप्ता भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होता यावे यासाठी केंद्र सरकारने पिक विमा योजनेची मुदत 23 जुलैपर्यंत मुदत वाढवली आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुणे शहरात आज ३३४ नवे कोरोना बाधित रुग्ण; तर कोरोनामुक्तांचा आकडा कमीच
- ‘नानांच्या नाना तऱ्हा; ते सकाळी एक बोलतात, दुपारी दुसरं आणि संध्याकाळी…’
- स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना शिवसेनेनं केली १० लाखांची मदत; एकनाथ शिंदेनी केलं कुटुंबियांच सांत्वन
- ‘मुंबई महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकेल’ ; भाजपचा विश्वास
- ‘स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही देशद्रोह कायदा गरजेचा आहे का ?’ ; सर्वोच्च न्यायालयाचा सवाल


