मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यकाळ फेब्रुवारी 2022 मध्ये संपतोय. त्यामुळे अवघ्या काही महिन्यांवर मुंबई महापालिका निवडणूक येऊन ठेपली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून मुंबईला ओळखलं जातं असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. मुंबई महापालिकेसाठी भाजपने मोर्चे बांधणी सुरू केली आहे.
बुधवारी मुंबई भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत रणनीती ठरवण्यासोबतच प्रमुख नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली. नितेश राणे यांच्यावरही महापालिका निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका अशी ज्या मुंबई महापालिकेची ओळख आहे, त्या मुंबई महापालिकेच्या 288 प्रभागात आगामी निवडणुकीच्या दृष्टीने काय रणनीती असावी? कोणत्या नेत्यांवर काय जबाबदारी? या संदर्भातील प्राथमिक बैठक पार पडली.
या बैठकीनंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल हा आत्मविश्वास आपल्याला असल्याचे भातखळखर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. तर शिवसेनेचे कट्टर विरोधक असणाऱ्या भाजपचे नेते नारायण राणे यांची केंद्रात वर्णी लागली असून केंद्रीय मंत्रिपद मिळाले आहे. शिवसेनेला शह देण्यासाठीच राणेंना मंत्रिपद दिले असल्याची चर्चा सुरु असताना आता दुसरीकडे आता नारायण राणेंचे चिरंजीव आमदार नितेश राणे यांना मुंबई महापालिका निवडणुकीच्या कोअर कमिटीवर घेण्यात आले आहे.
काल भाजपच्या कोअर कमेटीची आज मुंबईत बैठक झाली. यात भाजपा मुंबई प्रदेशने गठीत केलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणूक कोर कमेटीवर आमदार नितेश राणे यांची निवड करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘नानांच्या नाना तऱ्हा; ते सकाळी एक बोलतात, दुपारी दुसरं आणि संध्याकाळी…’
- शरद पवार महाविकास आघाडीचे रिमोट कंट्रोल; नाना पटोलेंचा वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
- स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना शिवसेनेनं केली १० लाखांची मदत; एकनाथ शिंदेनी केलं कुटुंबियांच सांत्वन
- ‘मुंबई विमानतळावर ‘आवाज’ हा मराठी माणसाचाच असेल’, मनसेचा इशारा
- ‘जशी पुण्याची मस्तानी जगात भारी तसा आमचा मुख्यमंत्री जगात भारी’ ; मनसेचा टोला


