Share

स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना शिवसेनेनं केली १० लाखांची मदत; एकनाथ शिंदेनी केलं कुटुंबियांच सांत्वन

Published On: 

🕒 1 min read

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने स्वप्नील लोणकर या तरुणाने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही 2 वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्नील लोणकर हळूहळू नैराश्यात गेला. या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेलं कर्ज यांसारख्या कारणांमुळेही स्वप्नीलवरील तणाव वाढत गेला. त्याच्या संयमाचा कडेलोट झाला आणि त्याने अखेर आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं होते.

त्यामुळे मागील काही दिवसांपासून याचे पडसाद राज्यभर उमटलेले पाहायला मिळत आहे. अनेक राजकीय नेतेमंडळी स्वप्नीलच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियाची विचारपूस करत आहेत. आज स्वप्नीलच्या कुटुंबियांची शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी शिवसेनेतर्फे कुटुंबीयांकडे मदत म्हणून १० लाख रुपयांचा धनादेश देखील सुपूर्द केला. यासोबतच, स्वप्नीलच्या बहिणीच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, ‘कोरोनाच्या संकटामुळे राज्य सरकारसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. परंतु, राज्य सरकार संवेदनशील आहे. स्वप्नील लोणकरच्या दुर्दैवी आत्महत्येची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेऊन 15 हजार 500 पदांची तातडीने भरती करण्याचा निर्णय घेतला. गेल्याच आठवड्यात झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विधानसभेत याबाबतचा निर्णय जाहीर केला असून याबाबतच्या कार्यवाहीला सुरुवात देखील केली आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यास राज्य सरकार कटिबद्ध आहे.’

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!