उस्मानाबाद : कोरोनाचा वाढता पादुर्भाव थांबवण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागलेली आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात गुन्हेगरीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. अशीच एक घटना तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग शिवारात घडली. थांबलेल्या ट्रकमधील तांब्याचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. चोरी, लुटालुटीच्या वाढत्या घटनेमुळे नागरिकात भितीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी चोरट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकातून होत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, हैदराबाद जिल्ह्यातील पानमंडी येथील मंहमद असलम बाबुमियॉ हे हैद्राबाद- कोल्हापूर मार्गावर ट्रकमधून तांब्याच्या साहित्याची वाहतूक करीत होते. दरम्यान, शनिवारी रात्री त्यांनी नळदुर्ग शिवारातील घाटात मंदिराजवळ ट्रक उभा केला होता. दरम्यान, चोरट्यांनी संधी साधून या ट्रकमधील तांबा पट्टीचे ७ नग चोरून नेले. ही चोरीची घटना निदर्शनास येताच महंमद यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली आहे.
त्यावरून अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. चोरीच्या वाढत्या घटनेमुळे वाहनधारकांसह नागरिकात घबराटीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी लुटालूट रोखण्यासाठी गस्त वाढवून प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे. अशा घटना येत्या काळात न घडाव्या म्हणून प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यायला हवी.
महत्त्वाच्या बातम्या
- बांगलादेश दौर्यादरम्यानच्या मंदिर भेटीवरून तृणमूलकडून मोदींवर आचारसंहिता भंग केल्याची तक्रार
- चित्रपटातील आणि प्रत्यक्षातील पोलिसांमध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो – उद्धव ठाकरे
- ‘या’ तारखेला विराट आरसीबीच्या कॅम्पमध्ये दाखल होणार
- ‘…आता तरी रहस्य कथेचा शेवट करा’; शाह-पवारांच्या भेटीवर संजय राऊतांच भाष्य
- ‘बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिक म्हणून मोदींना गौरवाचा ताम्रपट मिळायला हवा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

