Share

कोरोना वाढतोय : ८० टक्के ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी ठेवण्याचे आदेश

Published On: 

मुंबई : नव्या कोरोना रुग्णांचा राज्यातील वाढता आकडा पाहता आता याचा ताण आरोग्य यंत्रणांवर येऊ लागला आहे. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स आणि इतर आरोग्य सुविधाही अपुऱ्या पडू लागल्या आहेत. राज्यातील अनेक शहरांत बेड्सची संख्या अपुरी पडू लागले आहेत.

राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता वैद्यकीय वापरासाठी ८० टक्के ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे निर्देश आरोग्य विभागने दिले आहेत. तर उर्वरित २० टक्के ऑक्सिजन पुरवठा हा औद्योगिक वापरासाठी असणार आहे. नुकतंच आरोग्य विभागाने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. येत्या ३० जूनपर्यंत राज्यात हे आदेश लागू असणार आहे.

राज्यात कोरोना रुग्णांना उपचारासाठी ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर गरज भासत आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता वैद्यकीय कारणासाठी ऑक्सिजनचे उत्पादन अनेक पटीने वाढविण्याचे निर्देश उत्पादकांना देण्यात आले आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्याकरीता राज्यातील ऑक्सिजन उत्पादन केंद्रांच्या माध्यमातून होणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.

‘राज्यात दररोज ३५ ते ४० हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत असेल तर तशी वैद्यकीय व्यवस्था आहे का, हे पाहावं लागेल. परिस्थिती अशीच राहिली तर लॉकडाऊनसारखा पर्याय वापरावा लागेल,’ असे मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याआधी व्यक्त केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!