Share

तर सीटीस्कॅन मशीन सील करणार : जिल्हाधिकारी मुगळीकर

Published On: 

परभणी : कोरोनाच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी एचआर सीटीची टेस्ट करणे आवश्यक आहे. ही टेस्ट करताना सीटी स्कॅनसाठी जादा दर आकारणाराविरूध्द कठोर कारवाई करतानाच सीटी स्कॅन मशीन सील करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी संबधितांना दिले आहेत.

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत लागला आहे. दररोज शेकडो रुग्ण सापडू लागले आहेत. कोरोनाच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी एच.आर. सिटीची टेस्ट करणे आवश्यक असते. ही टेस्ट करण्यासाठी सीटीस्कॅनसाठी खुप जास्त दर आकारल्या जात आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांकडून वारेमाप पैसे उकळल्या जात असल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत.

कोरोनासारख्या महामारीत रुग्ण व त्यांच्या कुटूंबियांची लूट करणे योग्य नाही. मात्र, असे असतानाही काही झारीतले शुक्राचार्य ही वेळही कॅश करू लागले असल्याचे दुर्दैवी आहे. विशेषतः सीटीस्कॅन करताना लूट होऊ लागली असल्याच्या तक्रारी येत आहेत. तर जिल्हाधिकाऱ्यांची गंभीर दखल घेतली आहे. जर अशा तक्रारी आल्यास, पैसे जादा घेत असतील तर ती सीटी स्कॅन मशीन सील करण्याचे आदेश त्यांनी महापालिका प्रशासनास दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!