Share

‘ते’ हस्ताक्षर मोदींच नाहीच ! काँग्रेस नेत्याने व्हिडीओ शेअर करून केली पोलखोल

Published On: 

मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी व शनिवारी बांगलादेशच्या दौऱ्यावर गेले होते. कोरोना काळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच विदेश दौरा होता. बांगलादेशच्या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव आणि बंगबंधू शेख मुजबीर यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमासाठी त्यांना बोलावण्यात आलं होतं.

या दौऱ्यावेळी मोदींनी केलेल्या भाषणासोबतच हिंदू मंदिराला दिलेली भेट, पश्चिम बंगालसह आसाम निवडणुकांची पार्श्वभूमी यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. यासोबतच, ढाक्यापासून ३५ कि.मी. अंतरावर असलेल्या सावर येथे शहिदांच्या राष्ट्रीय स्मारक येथील नोंदवहीमधील लिहिलेल्या संदेशाचा फोटोही चांगलाच व्हायरल होत आहे. मोदींनी भेट दिल्यानंतर येथील नोंदवहीमध्ये संदेश लिहिला आहे. मोदींच्या हस्ताक्षराची वाह वाह केली जात आहे.

मात्र, या नोंदवहीतील हस्ताक्षरावर एका काँग्रेस नेत्याने आक्षेप घेतला आहे. भाजप महाराष्ट्र तर्फे मोदींनी नोंदवहीमध्ये लिहिलेल्या संदेशाचा फोटो शेअर करण्यात आला होता. काँग्रेसमधील अनुसुचित जाती विभागातील प्रदेश कार्यकारी अध्यक्ष असणाऱ्या डॉ. जितेंद्र देहाडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साबरमती आश्रमाच्या भेटीचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे.

विशेष म्हणजे, या व्हिडीओमध्ये नोंदवहीमध्ये आधीच लिहून ठेवलेल्या संदेशावर मोदी स्वाक्षरी करताना दिसत आहेत. ‘माननीय पंतप्रधान हे नेहमीच आधीच लिहिलेल्या संदेशावर स्वाक्षरी करतात. यावर कधी कोणीही आक्षेप घेतला नाही मग हा सुंदर हस्ताक्षराचा खटाटोप कशासाठी. मा.पंतप्रधान यांनी साबरमती आश्रम मधील भेटीत अभ्यागत पुस्तकामधे आधीच लिहिलेल्या संदेशावर स्वाक्षरी केली होती,’ अशी टीका केली आहे.

यासोबतच, त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांना देखील सवाल केला आहे. ‘चंद्रकांत दादा, आपल्या पक्षाच्या सोशल मिडिया टीम ची कीव येते. एवढा खोटेपणा कशासाठी…’ असा टोला देखील डॉ. जितेंद्र देहाडे यांनी लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!