Share

भाजप नेत्याच्या गोशाळेत ५०० गायींचा मृत्यू; आंदोलनानंतर डीएमने दिले चौकशीचे आदेश

Published On: 

भोपाळ : शहराजवळी बैरसिया भागातल्या बसई या गावात भाजप नेत्या निर्मला देवी शांडिल्य यांची गोशाळा आहे. या गोशाळेत ५०० गायींचा अज्ञात कारणाने मृत्यू झाला आहे. याबाबतचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ग्रामस्थांनी गोशाळेच्या संचालकावर कारवाईच्या मागणीसाठी आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी गोशाळेच्या संचालक निर्मला देवी शांडिल्य यांच्यावर फिर्याद दाखल केली आहे. भापाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच गायींचे शवविच्छेदन करुन मृत्यूमागचे कारण शोधावे, गोशाळेचा ताबा घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

शांडिल्य या भाजपच्या स्थानिक नेत्या असून गेल्या २० वर्षापूर्वी त्यांनी या गोशाळेची स्थापना केली आहे. गायीचा मृत्यू झाल्यानंतर व्हायरल झालेल्या व्हिडीओत एका खड्ड्यात काही मृत गायी दिसत आहेत. तर माळरानावर अनेक मृत गायी दिसत आहेत. काही ठिकाणी गायींचे सापळेही दिसत आहेत. शांडिल्य यांच्या गोशाळेत मृत्यूमुखी पडलेल्या गायींच्या संख्येबद्दल वाद निर्माण झाला असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी या गोशाळेतल्या ५०० हून अधिक गायी मरण पावल्याचा दावा केला आहे.

गायींच्या मृत्यूनंतर स्थानिक ग्रामस्थांनी गोशाळेपुढे निदर्शने करत गोशाळेच्या मुख्य संचालकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. धनश्याम गुप्ता या ग्रामस्थाने ही गोशाळा एक रॅकेट असून गायींना मारून त्यांच्या कातड्याची व हाडांची विक्री केली जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. शांडिल्य यांची गोशाळा १० एकर जमिनीवर असून ही जमीन सरकारी आहे. त्यांनी या जमिनीवर अतिक्रमण करून चोहोबाजूंनी ताराही लावल्या आहेत. असाही आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

याबाबत निर्मला देवी शांडिल्य म्हणाल्या, ‘या गोशाळेत आसपासच्या गावातल्या गायींना सोडण्यात येते. या गायींची सेवा केल्यास सरकारकडून १००-२०० रु.चे अनुदान मिळते. पण आपल्याला एका गायीची सेवा केल्यास प्रशासनाकडून दीड रुपया मिळतो, तोही दीड-दोन वर्षानंतर मिळतो. एवढ्या कमी पैशात गायींचा सांभाळ करता येत नाही पण आपण आपल्या पातळीवर गायीची सेवा करत आहे.’

‘थंडीमुळे गायींचा मृत्यू होऊ नये यासाठी या जागेवर आपण शेड बांधले होते पण प्रशासनाने ते काढून टाकले. आसपासच्या गावातले लोक आजारी गायींना येथे सोडून जातात. ज्या मृत गायी दिसत आहेत त्या आजारापणामुळे मेलेल्या असून या गायी आमच्या गोशाळेतील नाहीत तर बाहेरच्या लोकांच्या आहेत. काही ग्रामस्थ आमच्या गोशाळेवर टीका करत आहेत, कारण येथे चालणारा जुगार व दारुचा अवैध धंदा आपण बंद केला होता, असा दावाही दावा शांडिल्य यांनी केला. आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाऊ’ असेही त्या म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!