सातारा : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी पशूसंवर्धन मंत्री व दुग्ध आणि मत्सविकास मंत्री महादेव जानकर यांच्या मातोश्री गुणाबाई जगन्नाथ जानकर यांचे आज ३१ मार्च रोजी वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले आहे. त्यांना एकूण तीन मुलगगे आणि एक मुलगी असा परिवार होता. त्यांच्यावर आज सातारा जिल्ह्यातील पळसावडे येथे अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेली आहे.
महादेव जानकर यांच्या मातोश्री गुणाबाई जानकर यांचे मूळगाव सातारा जिल्ह्यातील धनगरवाडी हे होते. गुणाबाई यांनी शिक्षण घेतलेले नसले तरी आपल्या मुलांना उच्च शिक्षित करण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत त्यांनी आपल्या मुलांचा संभाळ करून त्यांना उच्चशिक्षित केले. यामुळेच महादेव जानकर हे त्यांच्या आयुष्यात उंच मजल मारू शकले.
महादेव जानकर यांच्या संघर्षाच्या काळात त्यांच्या आई गुणाबाई जानकर यांनी साथ दिली होती. मुलांनी शिक्षण घ्यावे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. महादेव जानकर हे मंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या बंगल्याच्या शेजारी निवासस्थानी राहण्याची संधी त्यांना मिळाली, त्यांच्या कष्टाचे चीज झाले, अशीच सर्वांनी भावना त्यावेळी व्यक्त केली होत्या.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना प्रतिबंधासाठी दररोज १० हजार चाचण्या
- जळगावमधील मानहानीकारक पराभवानंतर ‘त्या’ नगरसेवकांच्या अपात्रतेसाठी 30 हजार पानांची याचिका
- रवी शास्त्रींनी घेतली राज्यपाल कोश्यारींची भेट, चर्चांना उधाण
- पंढरपूर पोटनिवडणुक : वंचित बहुजन आघाडीची एन्ट्री , ‘हा’ उमेदवार रिंगणात
- कोरोनाचा धोका टाळण्यासाठी ‘या’ जिल्हयात तब्बल 15 दिवस असणार जमावबंदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

