Share

जलील म्हणाले, ‘होय, मी चुकलो! करा कारवाई माझ्यावर’

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : सामान्य नागरिकांमधून व्यक्त होणारा तीव्र रोष, लोकप्रतिनिधी, व्यापाऱ्यांसह विविध संघटनांकडून होणाऱ्या विरोधामुळे जिल्हा प्रशासनाने बुधवारपासून औरंगाबादेत लागू होणाऱ्या कडक लॉकडाऊनचा निर्णय मंगळवारी रात्री मागे घेतला. मात्र या निर्णयानंतर जलील
यांना खांद्यावर घेत त्यांच्या घरासमोरुन एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढली. यात जलील यांच्यासह सर्व कार्यकर्ते विनामास्क होते. तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना पायदळी तुडवत हि मिरवणूक थाटात निघाली.

औरंगाबाद जिल्ह्यातील लॉकडाऊन रद्द करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने काल राञी घेतला होता. त्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. खासदार जलील यांच्या या कृतीवर राज्यभरातून जोरदार टीका झाली. त्यानंतर खासदार जलील यांनी चूक झाल्याची कबूली दिली आहे. जलील म्हणाले, होय माझी चूक झाली. कायद्यानुसार जरुर कारवाई करा. पण, नियम मोडणाऱ्या सर्वच नेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जलील यांनी केली आहे.

जलील पुढे म्हणाले आहे की, होय माझी चूक झाली. कायद्यानुसार जरुर कारवाई करा. सर्वसामान्यांना जो कायदा आहे त्यानुसार माझ्यावरही कारवाई करा. मात्र, मीच काय तर देशातील अनेक नेते नियम मोडतात. त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जलील यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!